दक्षिण कोरिया : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी प्रारंभिक मतदान सुरू

0
दक्षिण
दक्षिण कोरियाच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार ली जे-म्युंग, २९ मे २०२५ रोजी दक्षिण कोरियातील सेऊल येथील मतदान केंद्रावर त्यांच्या समर्थकांसह आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या सुरुवातीच्या मतदानादरम्यान मतदानाचा हक्क बजावताना.  

दक्षिण कोरियाचे नागरिक गुरुवारी अभूतपूर्व संख्येने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रारंभिक मतदानासाठी लवकर बाहेर पडल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक पुढील आठवड्यात होणार आहे. 

मतदान लवकर सुरू झाल्याने दोन्ही आघाडीच्या उमेदवारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. माजी नेते यून सुक येओल यांनी लष्करी कायदा लागू करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यामुळे गेले काही महिने तिथे राजकीय गोंधळ आणि अराजकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर 3 जूनला निवडणूक होणार आहे.

लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ली जे-म्युंग, बुधवारी जनमत चाचण्या बंद होण्यापूर्वी या निवडणुकीत आघाडी घेतील असे चित्र होते. त्यांनी आज सेऊलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

“सध्याच्या संकटावर मात करण्यासाठी, पुनर्प्राप्ती आणि प्रगतीपथावरील कोरिया म्हणून पुन्हा सुरुवात करण्यासाठी, कृपया मतदान करा,” असे शहरातील विद्यापीठ जिल्ह्यात मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ली म्हणाले.

बँक ऑफ कोरियाने गुरुवारी व्याजदरात कपात केल्यानंतर आणि आशियातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेसाठीचा 2025 चा वाढीचा अंदाज 1.5 टक्क्यांवरून 0.8 टक्क्यांपर्यंत कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची टिप्पणी आली.

बुधवारी, ली यांनी “हवामान संकटाला प्रतिसाद देण्यासाठी” एक नवीन हवामान आणि ऊर्जा मंत्रालय स्थापन करण्याचे तसेच समान अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी, कोणत्याही  भेदभावाला विरोध करण्यासाठी लिंग समानता आणि कुटुंब मंत्रालयाचा विस्तार आणि पुनर्रचना करण्याचे वचन दिले.

राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सुमारे  31 लाख 07 हजार 164 लोकांनी किंवा एकूण पात्र मतदारांपैकी 7.00 टक्के मतदारांनी सकाळी 11 पर्यंत (0200 जीएमटी) मतदान केले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत समतुल्य कालावधीसाठी हे सर्वाधिक मतदान ठरले असून 2022 च्या मतदानाच्या तुलनेत 5.38 टक्के अधिक आहे.

दक्षिण कोरियामध्ये 44.39 दशलक्ष पात्र मतदार आहेत. गुरुवारी आणि शुक्रवारी लवकर मतदान करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ब्लॅकआउट कालावधीपूर्वी प्रकाशित झालेल्या गॅलप कोरियाच्या शेवटच्या सर्वेक्षणानुसार, ली यांना 49 टक्के जनतेचा सार्वजनिक पाठिंबा मिळाला, त्यानंतर त्यांचे मुख्य रूढीवादी प्रतिस्पर्धी पीपल पॉवर पार्टीचे किम मून-सू 35 टक्के आणि दुसरे रूढीवादी उमेदवार, न्यू रिफॉर्म पार्टीचे ली जुन-सोक 11 टक्के अशा क्रमाने उमेदवारांना पसंती मिळाली आहे.

किम आणि ली जुन-सोक यांनीही गुरुवारीच मतदान केले.

किम यांनी 12 मे रोजी मोहिमेच्या सुरुवातीला ली जे-म्युंग यांच्याबरोबर 20 टक्क्यांहून अधिक गुणांचे अंतर कमी केले होते, परंतु जून-सियोक यांनी या निवडणुकीतून बाहेर पडण्यास आणि देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा हे पटवून देण्यात ते अपयशी ठरले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleNASA: स्टारलाइनरच्या पुनर्प्राप्तीनंतर अंतराळवीर बुच व सुनिता पुन्हा सेवेत रुजू
Next articleOp Sindoor Validated Policy Of Self-Reliance In Defence: Rajnath Singh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here