
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मध्यस्थ इजिप्त तसेच कतार यांनी या योजनेची हमी दिली आहे असे सांगणाऱ्या या दस्तऐवजात हमासने युद्धबंदी करारावर स्वाक्षरी करताच गाझाला मानवतावादी मदत पाठवण्याचा समावेश आहे.
ही मदत संयुक्त राष्ट्रे, रेड क्रेसेंट आणि इतर मान्यताप्राप्त माध्यमांद्वारे दिली जाईल.
इस्रायलने प्रस्ताव स्वीकारला
गुरुवारी, व्हाईट हाऊसने सांगितले की इस्रायलने अमेरिकेच्या 60 दिवसांच्या युद्धबंदी प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे.
इस्रायली माध्यमांनी सांगितले की पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझामध्ये ओलिस असलेल्यांच्या कुटुंबियांना सांगितले की इस्रायलने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मध्य पूर्व राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी सादर केलेला करार स्वीकारला आहे.
पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने सांगितले की ते या योजनेचा आढावा घेत असून शुक्रवार किंवा शनिवारी त्यावर आपला निर्णय जाहीर करतील.
कायमस्वरूपी युद्धबंदी लागू झाल्यानंतर हमासने उर्वरित 58 इस्रायली बंधकांपैकी शेवटच्या 30 जणांना सोडण्याची तरतूद केली आहे. युद्धबंदी लागू होताच इस्रायल गाझामधील सर्व लष्करी कारवाया थांबवेल, असे त्यात म्हटले आहे.
इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने आपले सैन्य पुन्हा माघारी घेईल.
मार्चमध्ये संपुष्टात आलेली युद्धबंदी पुनर्संचयित करण्याच्या पूर्वीच्या प्रयत्नांना हमास आणि इस्रायलमधील मतभेदांमुळे अडथळा निर्माण झाला आहे.
युद्ध संपवण्यास सहमती देण्यापूर्वी हमास पूर्णपणे नि:शस्त्र करावे, लष्करी आणि शासकीय दल म्हणून ते मोडून काढावे आणि गाझामध्ये अजूनही असलेल्या सर्व 58 बंधकांना परत करावे असा इस्रायलचा आग्रह आहे.
हमासने निःशस्त्र होण्याची मागणी नाकारली आहे. उलट इस्रायलने गाझामधून आपले सैन्य बाहेर काढावे आणि युद्ध संपवण्यासाठी वचनबद्ध व्हावे असे त्याने म्हटले आहे.
इस्रायली आकडेवारीनुसार, 7 ऑक्टोबर 2023 रोजी दक्षिणेकडील हमासने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझामध्ये आपली मोहीम सुरू केली, ज्यामध्ये सुमारे 1 हजार 200 नागरिक मारले गेले आणि 251 इस्रायलींना गाझामध्ये ओलिस ठेवण्यात आले.
त्यानंतरच्या इस्रायली लष्करी मोहिमेत 54 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे, असे गाझा आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा संपूर्ण परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
वाढता दबाव
इस्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे, अनेक युरोपीय देश इस्रायलवर उघडपणे टीका करण्यास टाळाटाळ करत असले तरी युद्ध थांबवण्याची आणि मोठ्या मदत प्रयत्नांची उघडपणे मागणी करत आहेत.
विटकॉफ यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की वॉशिंग्टन संघर्षातील दोन्ही देशांना युद्धबंदीबद्दल “एक नवीन प्रस्ताव पाठवण्याच्या” जवळपास तयार आहे.
“त्या संघर्षाचा दीर्घकालीन तोडगा, तात्पुरती युद्धबंदी आणि दीर्घकालीन तोडगा, शांततापूर्ण तोडगा काढण्याविषयी माझ्या काही चांगल्या भावना आहेत,” असे विटकॉफ त्यावेळी म्हणाले.
योजनेनुसार, कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी वाटाघाटी निश्चित कालावधीत पूर्ण न झाल्यास 60 दिवसांच्या युद्धबंदीचा कालावधी वाढवता येऊ शकतो.
हमासचा वरिष्ठ अधिकारी सामी अबू झुहरी याने गुरुवारी सांगितले की, प्रस्तावातील अटी इस्रायलच्या भूमिकेचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या असून त्यात युद्ध संपवणे, इस्रायली सैन्य मागे घेणे किंवा हमासने मागणी केल्याप्रमाणे मदत स्वीकारणे या वचनबद्धता समाविष्ट नाहीत.
अमेरिकेने पाठिंबा दिलेला आणि इस्रायलने मान्यता दिलेला खाजगी गट, द गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशनने गुरुवारी गाझामधील तिसऱ्या ठिकाणी मदत वितरण व्यवस्था केली.
संयुक्त राष्ट्र आणि इतर मदत गटांनी ही व्यवस्था अपुरी आणि सदोष असल्याची जोरदार टीका केल्यानंतर, गटाने या आठवड्यात गाझामध्ये आपले कार्य सुरू केले, जिथे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की इस्रायलने एन्क्लेव्हमध्ये प्रवेश करणाऱ्या मदतीवर 11 आठवड्यांच्या नाकेबंदीनंतर 2 दशलक्ष लोक दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत.
मंगळवारी हजारो पॅलेस्टिनी लोक वितरण केंद्रांवर धावले. खाजगी सुरक्षा कंत्राटदारांना त्यावेळी माघार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे या वितरणात प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले.
कार्यवाहीच्या अस्ताव्यस्त सुरुवातीमुळे इस्रायलवर अधिक अन्नपुरवठा करण्यासाठी आणि गाझामधील लढाई थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे. GHF ने आतापर्यंत सुमारे 18 लाख जेवणाचा पुरवठा केला असून येत्या आठवड्यात आणखी ठिकाणी ही मदत सुरू करण्याची योजना आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)