इराण-इस्रायल हवाई तणाव, ट्रम्प यांचे बंकर-बस्टर बॉम्ब तैनात करण्याचे संकेत

0
हवाई हल्ले
दोन 30 हजार पौंड GBU-57ए/बी मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर (एमओपी) वाहून नेण्यास सक्षम असलेले अमेरिकन एअर फोर्सचे बी-2 स्पिरिट स्ट्रॅटेजिक बॉम्बर, इराण-इस्रायल संघर्षाच्या दरम्यान कतारमधील अल उदेद हवाई तळावर पोहोचले.

इस्रायलने इराणच्या आण्विक तसेच लष्करी पायाभूत सुविधांवर हवाई हल्ले वाढवले असताना, ट्रम्प प्रशासन या संघर्षात आपलाही सहभाग असावा असा विचार करीत आहेः त्यादृष्टीने GBU-57 मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर (एमओपी) – जे अमेरिकेच्या शस्त्रागारातील सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र नसलेले शस्त्र – तैनात करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

30 हजार पौंड वजनाचे एमओपी विशेषतः इराणच्या मोठ्या तटबंदीच्या फोर्डो इंधन संवर्धन प्रकल्पासारखे खोलवर दडलेले लक्ष्य नष्ट करण्यासाठी तयार केले गेले आहे, जे पारंपरिक शस्त्रास्त्रांसाठी इतक्या खोल भूमिगत भागात पोहोचणे अशक्य आहे. अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बी-2 स्पिरिट स्टील्थ बॉम्बर-जीबीयू-57 वाहून नेण्यास सक्षम असलेले एकमेव विमान-heightened alert वर ठेवण्यात आले आहे.

फोर्डो: अस्पष्ट लक्ष्य

2009 पासून कार्यरत असलेली फोर्डो सुविधा 80 ते 100 मीटर जमिनीखाली, दगडांच्या थराखाली आणि प्रबलित काँक्रीटच्या थराखाली गाडली गेली आहे. इस्रायली हल्ल्यांमुळे इतर अणुस्थळांवर पृष्ठभागाच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असले तरी, फोर्डो अजूनही सुरक्षित आहे याचे मुख्य कारण म्हणजे सध्याची इस्रायलची कोणतीही युद्धसामग्री तिथे पोहोचू शकत नाही.

इस्रायलकडे अमेरिकेने पुरवलेले GBU-28 आणि BLU-109 सारखे बंकर-बस्टर आहेत, परंतु ही शस्त्रे आवश्यक खोलीपर्यंत पोहोचून ती  भेदण्यात कमी पडतात. त्यामुळे GBU-57 अशाच परिस्थितीसाठी डिझाइन केले होते. हे स्फोट होण्यापूर्वी 60 मीटर काँक्रीट किंवा 200 फूट मातीतून बोअरिंग करण्यास सक्षम.

संरक्षण सूत्रांनी असे सुचवले आहे की फोर्डोला निष्क्रिय करण्यासाठी अनेक, सलग GBU-57 हल्ले आवश्यक असू शकतात, ज्यामुळे अशा ऑपरेशनची तांत्रिक अडचण आणि संभाव्य व्याप्ती अधोरेखित होते.

अमेरिकेचा संभाव्य सहभाग

जर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी GBU-57 चा वापर करण्यास परवानगी दिली, तर तो एक नाट्यमय बदल ठरेल कारण गुप्तचर आणि बचावात्मक समर्थन देण्याऐवजी इराणी भूभागावर थेट आक्रमक हल्ले करण्याकडे मग कल असेल. अशा हालचालीमुळे संपूर्ण प्रदेशात धक्कादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे आधीच अस्थिर असलेल्या संघर्षाचे परिणाम नाट्यमयरित्या वाढू शकतात.

“हा एक लाल रेषेचा क्षण असेल,” एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले. “पण हा इराणच्या आण्विक महत्त्वाकांक्षेविरुद्ध एक निर्णायक हल्ला देखील असू शकतो.”

लष्करी विश्लेषकांनी इशारा दिला आहे की फोर्डोवर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील कोणत्याही हल्ल्यामुळे इराणकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते. मग ते क्षेपणास्त्र हल्ले आणि सायबर हल्ल्याच्या प्रत्युत्तरापासून ते होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतुकीत व्यत्यय आणण्यापर्यंत अशाप्रकारची प्रतिक्रिया उमटू शकते.

स्पष्टीकरण : GBU-57 मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर म्हणजे काय?

GBU-57A/B मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर हे अमेरिकेने विकसित केलेले सर्वात प्रगत बंकर-बस्टिंग शस्त्र आहे. अत्यंत कठीण लक्ष्य नष्ट करण्यासाठी बोईंगने हे बनवले असून, ते पारंपरिक शस्त्रांना प्रतिरोधक असलेल्या भूमिगत सुविधांना निष्क्रिय करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये:

  • वजन: 13 हजार 600 किलो (30 हजार पौंड)
  • वॉरहेड: 2 हजार 500 ते 2 हजार 700 किलो उच्च स्फोटक
  • लांबी: अंदाजे 6.2 मीटर (20 फूट)
  • प्रवेश: 60 मीटर पर्यंत प्रबलित काँक्रीट किंवा 200 फूट पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली
  • प्लॅटफॉर्म: फक्त B-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बरद्वारे वितरित केले जाऊ शकते (प्रति उड्डाण दोन)
  • मार्गदर्शन: GPS/INS अचूक लक्ष्यीकरण प्रणाली

इतर सामान्य बॉम्बपेक्षा वेगळे, एमओपी स्फोटापूर्वी घन खडकात किंवा काँक्रीटमध्ये खोलवर खोदण्यासाठी बनवले जाते, ज्यामुळे आण्विक सुविधांव्यतिरिक्त इतर सर्व संरक्षण सुविधा कोसळू शकतात किंवा नष्ट होऊ शकतात.

धोरणात्मक संकेत आणि जागतिक परिणाम

यासंदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय जगजाहीर  झालेला नसला तरी, अलिकडच्या घडामोडी – डिएगो गार्सियाला B-2 बॉम्बरच्या हालचाली आणि उच्चस्तरीय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकींसह – असे सूचित करतात की अमेरिका सक्रियपणे या  पर्यायाचा विचार करत आहे.

“एमओपी हा केवळ बॉम्ब नाही – तो एक संदेश आहे,” असे पेंटागॉनच्या एका माजी रणनीतिकाराने म्हटले आहे. “जर हे तैनात केले तर याचा अर्थ असा होईल की अमेरिकेचा राजनैतिक पातळीवर सुरू असणाऱ्या चर्चेवरचा विश्वास उडाला आहे – आणि तो निर्णायकपणे कृती करण्यास तयार आहे.”

इराणच्या आण्विक कार्यक्रमाला अनेक स्तरांवर लक्ष्य करण्याच्या संयुक्त प्रयत्नात, कोणत्याही संभाव्य हल्ल्यापूर्वी इस्रायली कारवायांशी जवळून समन्वय साधला जाण्याची शक्यता आहे.

जर हा निर्णय अंमलात आणला गेला तर, युद्धात जीबीयू-57 चा हा पहिला ज्ञात होणारा वापर असेल. मात्र त्याचबरोबर इराणच्या आण्विक भविष्याबद्दलच्या प्रदीर्घ, संदिग्ध संघर्षातील तो एक निर्णायक क्षण आणि वाढत्या प्रादेशिक संघर्षाचे गंभीर चिन्हही असेल.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleIndian Army Sets Up Third Dhanush Regiment to Sharpen Artillery Edge
Next articleभारतीय लष्कर तिसऱ्या ‘धनुष’ तोफखाना रेजिमेंटची स्थापना करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here