आवश्यक व्यवस्थापनाला अंतिम रूप देण्याच्या दृष्टीने ब्रिटिश अधिकारी सध्या भारतीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत.
एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्सवर तैनात असलेल्या यूकेच्या कॅरियर स्ट्राइक ग्रुपचा भाग असलेले हे प्रगत जेट 14 जून रोजी प्रतिकूल हवामान आणि कदाचित कमी इंधन पातळीमुळे केरळकडे वळवण्यात आले. तेव्हापासून, फिफ्थ जनरेशनचे हे विमान तिथेच उभे करण्यात आले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले असून यासंदर्भात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.
एका अधिकृत निवेदनात, ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या प्रवक्त्याने घटनास्थळी यूकेचे अभियांत्रिकी पथक तैनात केल्याची पुष्टी केली.
“आपत्कालीन परिस्थितीत विमान वळवण्यात आलेले आणि केरळ येथे उतरवले गेलेले यूके F-35B या विमानाची तपासणी आणि दुरुस्ती करण्यासाठी यूके अभियांत्रिकी पथक तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात करण्यात आले आहे,” असे प्रवक्त्याने सांगितले.
“यूकेने देखभाल दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) सुविधेची ऑफर स्वीकारली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी यासंदर्भात अंतिम चर्चा करत आहे. मानक प्रक्रियेनुसार, वाहतूक आणि दुरुस्ती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली विशेष उपकरणे घेऊन जाणाऱ्या यूके अभियंत्यांच्या आगमनानंतर विमान तिथून हलवण्यात येईल.”
“भारतीय अधिकाऱ्यांच्या आणि विमानतळ पथकांच्या सतत मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल यूके खूप आभारी आहे,” असेही या पत्रकात म्हटले आहे.
रॉयल नेव्ही कर्मचाऱ्यांचे सुरुवातीचे दुरुस्तीचे प्रयत्न अयशस्वी झाले असले तरी, दुसरे अभियांत्रिकी पथक – ज्यात सुमारे 40 तज्ज्ञांचा समावेश आहे – 5 जुलैला केरळमध्ये पोहोचले आहे. हे पथक प्रगत निदान साधने आणि उपकरणे घेऊन आले आहे जेणेकरून विमान आहे त्याच जागेवरून उड्डाण करू शकेल का याचे मूल्यांकन करता येईल.
ब्रिटिश संरक्षण सूत्रांनी स्पष्ट केले आहे की F-35B विमानाचे भाग पूर्णपणे वेगळे करून C-17 ग्लोबमास्टरच्या मदतीने देशात घेऊन जाणे हा एक उपाय नक्कीच आहे मात्र आलेले पथक हाच निर्णय घेईल याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
अशा अत्यंत प्रगत विमानाचे भाग सुटे करणे हे विशेषतः संवेदनशील स्टील्थ तंत्रज्ञानाच्या संरक्षणाबाबत, लॉजिस्टिक आणि सुरक्षाविषयक अडचणी निर्माण करणारे ठरते. मात्र जर विमानाचे भाग सुटे करण्याचा निर्णय घेतला गेलाच तर ते केवळ लॉकहीड मार्टिन-प्रमाणित अभियंत्यांद्वारे कठोर प्रोटोकॉल पाळतच केले जाईल.
विमानावर रॉयल नेव्ही कर्मचाऱ्यांसह भारताच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाद्वारे (CISF) चोवीस तास पहारा दिला जात आहे, सर्व हालचालींवर कडक नियंत्रण ठेवले जाते.
भारतीय हवाई दलाने उघड केले की त्याच्या इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टमने (आयएसीसीएस) अरबी समुद्रावर विमानाचा मागोवा घेतला. यामुळे F-35 च्या रडारसारख्या यंत्रणेमध्येही दिसून न येण्याच्या क्षमतेबाबत वाद निर्माण झाला आहे. तज्ज्ञांनी असे नमूद केले आहे की हे लढाऊ विमान शोधणे अत्यंत कठीण आहे, परंतु ते संपूर्ण अदृश्यतेच्या गृहितकांविरूद्ध सावधगिरी बाळगतात-विशेषतः अपरिचित परिचालन वातावरणात.
भारतीय हवाई दलाने उघड केले की त्यांच्या एकात्मिक हवाई कमांड आणि नियंत्रण प्रणालीने (IACCS) अरबी समुद्रावर विमानाचा मागोवा घेतला, ज्यामुळे F-35 च्या बहुचर्चित रडार चोरीच्या क्षमतेवर वादविवाद सुरू झाला. तज्ज्ञांनी नोंदवले की लढाऊ विमान शोधणे अत्यंत कठीण आहे, मात्र अपरिचित ऑपरेशनल वातावरणात ते पूर्णपणे अदृश्यच असेल हा समज कदाचित खोटा ठरू शकतो असा सावध पवित्रा त्यांनी घेतला आहे.
सध्या सर्वांच्या नजरा तिरुअनंतपुरमवर आहेत, कारण युकेची अभियांत्रिकी टीम एका महत्त्वपूर्ण मूल्यांकनाची तयारी करत आहे.
टीम भारतशक्ती