शनिवारी, यूकेचे परराष्ट्रमंत्री David Lammy यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी कायम राहावी आणि दोन्ही देशांमध्ये विश्वासार्हतेच्या उपाययोजना (confidence-building measures) व संवाद घडावा, यासाठी ब्रिटन अमेरिकेसोबत सहकार्य करत आहे.
पाकिस्तानने म्हटले आहे की, “अमेरिकेव्यतिरिक्त ब्रिटन आणि इतर देशांनीही दक्षिण आशियातील या अण्वस्त्रधारी प्रतिस्पर्ध्यांमधील दशकांतील सर्वात भीषण संघर्ष थांबवण्यात मोठी भूमिका बजावली. गेल्या आठवड्यात भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर, 10 मे रोजी झपाट्याने राजनैतिक हालचाली करत शस्त्रसंधी साधण्यात आली,” पण तज्ज्ञ आणि मुत्सद्दी म्हणतात की, ती अजूनही नाजूक स्थितीत आहे.”
“शस्त्रसंधी दीर्घकाळ टिकावी, दोन्ही देशात संवाद सुरू रहावा यादृष्टीने तसेच भारत व पाकिस्तान यांच्यात विश्वास वाढवण्यासाठी कोणते उपाय करता येतील, हे आम्ही पाहत आहोत. त्यासाठी आम्ही अमेरिकेसोबत काम करत राहू,” असे लाम्मी यांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर Reuters ला सांगितले.
भारत-पाकिस्तान संघर्ष
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांच्या हद्दीत क्षेपणास्त्र डागली. भारताने पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले असून, पाकिस्तानने त्याचा निषेध केला आहे.
शस्त्रसंधी झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, “भारत-पाकिस्तान चर्चेसाठी तिसऱ्या देशात बैठक होण्याची गरज आहे. मात्र, अद्याप यासाठीची तारीख किंवा ठिकाण निश्चित करण्यात आलेले नाही.”
“या दोन्ही शेजारी देशांचा दीर्घ इतिहास आहे, पण गेल्या काही काळात त्यांच्यात संवाद झाला असण्याची शक्यताही फारशी राहिलेली नाही. आम्हाला हे पाहायचे आहे की, हे वाढते तणाव थांबवले जावे आणि शस्त्रसंधी टिकून राहावी,” असे लाम्मी म्हणाले.
भारताने ‘इंडस जल करारातील’ (Indus Water Treaty) सहभाग स्थगित केल्याविषयी जेव्हा लाम्मी यांनी विचारले गेले, तेव्हा ते म्हणाले की, “आम्ही सर्व पक्षांना कराराच्या अटींचे पालन करण्याचे आवाहन करू इच्छितो.”
गेल्या महिन्यात भारताने सांगितले की, ‘1960 मध्ये झालेल्या या करारातील आपला सहभाग “स्थगित” केला आहे. पाकिस्तानने चेतावणी दिली होती की, जर यामुळे त्यांच्या जलस्रोतांमध्ये अडथळा निर्माण झाला, तर ते युद्धपातळीवरील कृती मानतील.”
लाम्मी म्हणाले की, “दहशतवाद हा पाकिस्तान आणि अन्य प्रदेशांसाठी एक गंभीर संकट आहे, त्यामुळे ब्रिटन पाकिस्तानसोबत दहशतवादाविरोधात काम करत राहील.”
लाम्मी यांनी युक्रेन-रशिया शस्त्रसंधीबाबत चर्चेत, रशियाने “गोंधळ निर्माण केला” असा आरोपही केला. ही चर्चा दोन तासांपेक्षा कमी काळ चालली आणि यावर ट्रम्प म्हणाले की, “ते पुतिन यांना थेट भेटल्याशिवाय पुढे काहीही घडणार नाही.”
“पुन्हा एकदा रशियाच्या बाजूने गोंधळ निर्माण करणारी आणि शांतीबाबत गंभीरता नसलेली भूमिका दिसून आली आहे,” असे लाम्मी म्हणाले. “आता तरी आपण पुतिन यांना सांगणार आहोत की, बस आता पुरे झाले,” अशी प्रतिक्रीयाही त्यांनी दिली.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीसह)