अमेरिकेच्या San Diego लष्करी निवास क्षेत्रात विमान कोसळून, 2 जणांचा मृत्यू

0

गुरुवारी पहाटे, सुमारे 3:45 वाजता (स्थानिक वेळेनुसार) San Diego परिसरातील, एका लष्करी गृहनिर्माण वसाहतीत लहान जेट विमान कोसळले, ज्यामध्ये किमान दोन जणांचा मृत्यू झाला आणि आठ जण जखमी झाले. या दुर्घटनेत अनेक घरे आणि वाहनांचेही नुकसान झाले.

विमान कोसळले तेव्हा त्यात किती लोक होते हे स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी सांगितले की जमिनीवर कोणीही मरण पावले नाही असा त्यांचा विश्वास आहे परंतु ते लगेच पुष्टी करू शकत नाहीत.

दुर्घटनास्थळ मोंटगोमरी-गिब्स एक्झिक्युटिव्ह एअरपोर्टपासून, सुमारे 2 मैल पूर्वेकडे आहे. अग्निशमन दलाचे सहाय्यक प्रमुख डॅन एडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “विमान क्रॅश झाल्यानंतर  एक घर आणि अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी आली.”

San Diego पोलीस विभागाने, सकाळी 11 वाजेपर्यंत दोन मृत्यूंची आणि आठ जखमींची पुष्टी केली, ज्यापैकी फक्त एका व्यक्तीला सौम्य जखमांसह रुग्णालयात दाखल करण्यात आले.

100 हून अधिक नागरिकांचे स्थलांतर

या दुर्घटनेनंतर, सुमारे 100 स्थानिक रहिवाशांना त्यांच्या घरांमधून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

ज्याठिकाणी हा अपघात झाला, ते ठिकाण ‘लिबर्टी मिलिटरी हाउसिंग’ या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली आहे.

फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशननुसार, हे विमान Cessna 550 होते आणि ते मिडवेस्टमधून सान डिएगोच्या दिशेने जात होते.

लष्करी कुटुंबांसाठी तात्पुरते निवास

San Diego नौदल तळाचे कमांडिंग ऑफिसर- कॅप्टन बॉब हेली यांनी सांगितले की, “प्रभावित लष्करी कुटुंबांसाठी आम्ही तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करत आहोत.” या कामात ‘लिबर्टी मिलिटरी हाउसिंग’ आणि रेड क्रॉसची मदत घेतली जात आहे.

San Diego सिटी कौन्सिलचे सदस्य रॉल कॅम्पिलो म्हणाले की, “या दुर्घटनेमुळे मोठे जीवित नुकसान होऊ शकले असते. देवाचे आभार की जमिनीवर कुणाचाही मृत्यू झाला नाही.”

फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB). या दुर्घटनेची अधिक चौकशी करत आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleAustralia floods: पुरामध्ये 4 जणांचा मृत्यू, शोधकार्य सुरू
Next articleपरदेशी विद्यार्थ्यांच्या हार्वर्डमधील प्रवेशावर ट्रम्प प्रशासनाकडून बंदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here