झेन टेक्नॉलॉजीजला लेसर आधारित लढाऊ प्रशिक्षणासाठी पेटंट मंजूर

0

हैदराबाद | 27 जून 2025: झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (Zen) ने, त्यांच्या 54व्या भारतीय पेटंटची घोषणा केली आहे. ‘Single ILU Long Pass Filter’ या नावाने मंजूर झालेल्या या पेटंटद्वारे, लेझर-आधारित सैनिकी प्रशिक्षण प्रणालींमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रगती साधण्यात आली आहे.

लॉन्ग-पास ऑप्टिकल फिल्टर

नवीन पेटंट केलेले, लॉन्ग-पास ऑप्टिकल फिल्टर दृश्यमान (visible) आणि इन्फ्रारेड लेझर बीम्स यांचे एकत्रीकरण एकाच, स्थिर आउटपुटमध्ये सुलभ करते. या नवकल्पनेमुळे युद्ध प्रशिक्षण सिम्युलेटरमध्ये अचूकता, वास्तववादी अनुभव आणि प्रतिसादक्षमता मोठ्या प्रमाणात वाढते. पारंपरिक प्रणालींमध्ये स्वतंत्र बीम्सचा वापर केला जातो आणि त्यात संरेखन व टिकाऊपणाशी संबंधित अडचणी येतात. मात्र झेनचे हे सघन आणि मजबूत डिझाइन, प्रतिकूल परिस्थितीतही उत्कृष्ट ऑप्टिकल कामगिरी देते आणि पुनःकॅलिब्रेशन व देखभालीची गरज लक्षणीयरीत्या कमी करते.

निर्यात संधींचा मार्ग मोकळा

या तांत्रिक प्रगतीमुळे भारतातील क्षमतांमध्ये भर पडलीच आहे, पण त्याचबरोबर झेनसाठी महत्त्वपूर्ण निर्यात संधी निर्माण झाल्या आहेत. अनेक देश आपली सैनिकी प्रशिक्षण यंत्रणा आधुनिकीकरणाच्या दिशेने नेत असल्यामुळे, झेनचे हे हाय-परफॉर्मन्स, किफायतशीर आणि हलकं स्वरूप असलेलं तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय मागणी पूर्ण करण्यास योग्य ठरते. या पेटंट यंत्रणेचा सघन डिझाइन आणि मॉड्युलर रचना यामुळे ते पूर्ण सिम्युलेटर सेटअपसाठीच नव्हे, तर मोबाईल वापरासाठी आणि निर्यात केंद्रित मॉडेलसाठीही आदर्श आहे.

आत्मनिर्भरतेकडे महत्त्वाचे पाऊल

ही कामगिरी, भारताची स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान विकासातील क्षमता अधोरेखित करते. परकीय घटकांवरील अवलंबन कमी करून आणि देशांतर्गत संशोधन व विकासावर भर देऊन, झेन टेक्नॉलॉजीज देशासाठी अधिक आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक संरक्षण उत्पादन इकोसिस्टम तयार करण्यास हातभार लावत आहे. हे पेटंट झेनच्या वाढत्या बौद्धिक संपदा पोर्टफोलिओमध्ये एक महत्त्वाची भर असून, स्वदेशी नवोपक्रमातील सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित करते.

झेन टेक्नॉलॉजीजचा वारसा

झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, ही संरक्षण प्रशिक्षण व अँटी-ड्रोन उपाययोजनांमध्ये जागतिक दर्जाची उत्पादने पुरवणारी आघाडीची भारतीय कंपनी आहे. लष्करी प्रशिक्षण व सुरक्षा दलांची युद्ध सज्जता मोजण्यासाठी सुसज्ज प्रणाली तयार करण्याचा झेनला दीर्घ अनुभव आहे. हे पेटंट कंपनीचे जागतिक पातळीवर 82वे पेटंट असून, स्वदेशी संशोधन आणि नवोपक्रमाच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात नेतृत्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleयूकेचे F-35B लढाऊ विमान अखेर केरळच्या MRO सुविधेत हलवले जाणार
Next articleट्रम्प यांनी Tech Tax बाबत कॅनडासोबतची व्यापार चर्चा स्थगित केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here