2024 मध्ये चीनमधील सर्वात मोठा स्मार्टफोन विक्रेता म्हणून ॲपलच्या स्थानात घसरण झाली आहे. स्थानिक प्रतिस्पर्धी विवो आणि हुआवेने आयफोन उत्पादकाला मागे टाकले आहे. ॲपलची देशातील वार्षिक निर्यातीत 17 टक्के घट झाली असल्याचे संशोधन कंपनी कॅनालिसच्या आकडेवारीवरून गुरुवारी दिसून आले.
सर्वात मोठी विक्री घट
ॲपलची ही चीनमधील आतापर्यंतची सर्वात मोठी वार्षिक विक्री घट असून अहवालानुसार अंतिम तिमाहीत 25 टक्के घसरणीसह सर्व चारही तिमाहींमधील घसरण समाविष्ट होते.
संपूर्ण वर्षभर, बजेट स्मार्टफोन निर्मात्या विवोने चीनमध्ये 17 टक्के मार्केट शेअर काबीज केले आहे, त्यानंतर प्रतिस्पर्धी हुआवेने 16 टक्के आणि ॲपल 15 टक्क्यांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. ही टक्केवारी सर्वात सर्वात मोठ्या जागतिक बाजारपेठांपैकी एका देशांतर्गत उत्पादकांकडून येणाऱ्या विक्रीचा वाढता दबाव दाखवणारी आहे.
चॅटजीपीटी उपलब्ध नसलेल्या चीनमध्ये विकल्या गेलेल्या नवीनतम आयफोनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमतांची अनुपस्थिती यासारख्या घटकांमुळे ॲपलची विक्री कशी खालावत आहे याकडेही ही घसरण निर्देश करते.
कॅनालिसचे विश्लेषक टोबी झू म्हणाले, “चीनमधील ॲपलची ही सर्वात वाईट वार्षिक कामगिरी आहे.”
बाजारपेठेतील आव्हाने
त्यांच्या मते, “ॲपलच्या बाजारपेठेतील उत्कृष्ट स्थानाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोः हुआवेईचे सातत्यपूर्ण फ्लॅगशिप प्रकाशन, उच्च किंमतीच्या विभागांमध्ये देशांतर्गत फोल्डेबल फोनचा प्रसार आणि शाओमी तसेच विवोसारख्या अँड्रॉइड ब्रँड्स तांत्रिक नवकल्पनांद्वारे ग्राहकांची निष्ठा वाढवण्यासाठी मदत करतात.
अमेरिकेच्या निर्बंधांनंतर ॲपलने यापूर्वी चार वर्षे सातत्यपूर्ण बाजारपेठेत पहिल्या स्थानाचा आनंद लुटला होता. 2019 मध्ये हुआवेईला अमेरिकी तंत्रज्ञानाच्या वापरावर मर्यादा घालून त्याचे बाजारपेठेतील अस्तित्व मर्यादित ठेवले होते.
मात्र हुआवेने ऑगस्ट 2023 पासून प्रिमियम विभागात जोरदार पुनरागमन केले आहे, त्याने स्थानिक पातळीवर तयार केलेल्या चिपसेटसह नवीन फोन लॉन्च केले. या चिनी कंपनीने चौथ्या तिमाहीत निर्यातीत 24 टक्के वाढ नोंदवली.
ॲपलचा संघर्ष
आयफोन निर्मात्याने विक्रीला चालना देण्यासाठी दुर्मिळ सवलतींची खैरात करण्याचा अवलंब केला आहे. विक्रीला चालना देण्यासाठी ॲपलने त्यांच्या अधिकृत चॅनल्सद्वारे त्यांच्या आयफोन 16 मॉडेल्सवर 500 युआन (68.50 अमेरिकन डॉलर्स) पर्यंतच्या किंमतीत कपात करण्याची ऑफर दिली आहे. 4 ते 7 जानेवारीपासून चीनमध्ये चार दिवसांची त्याची जाहिरातही सुरू केली.
प्रमुख चिनी ई-कॉमर्स मंचांनी त्यांच्या स्वतःच्या जाहिरातींसह त्यांचे अनुसरण केले आहे. अलीबाबाच्या टिमॉल मार्केटप्लेसने आयफोन 16 मालिकेतील नवीनतम उपकरणांवर हजार युआन (137 अमेरिकन डॉलर) पर्यंतची सूट जाहीर केली.
कॅनालिसच्या आकडेवारीनुसार, पहिल्या पाच विक्रेत्यांमध्ये, मुख्यतः बजेट-केंद्रित शाओमीने चौथ्या तिमाहीच्या शिपमेंटमध्ये 29 टक्के वाढ नोंदवली, तर ओप्पो आणि विवोने अनुक्रमे 18 टक्के आणि 14 टक्के वाढ नोंदवली.
2024 मध्ये चीनमधील स्मार्टफोनची वार्षिक निर्यात वर्षागणिक 4 टक्क्यांनी वाढून 28.5 कोटी युनिट्स झाली.
अनुकृती
(रॉयटर्स)