Thursday, March 5, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi इम्रान खान यांच्या मृत्यूची अफवा आणि पाकिस्तानचा रक्तरंजित इतिहास

इम्रान खान यांच्या मृत्यूची अफवा आणि पाकिस्तानचा रक्तरंजित इतिहास

0

काबूलमधील एका वृत्तपत्राने (अफगाणिस्तान टाईम्स) एक संदिग्ध बातमी दिली ज्यामुळे अफवांना वेग आला. पाकिस्तानमधील विश्वासार्ह सूत्रांचा हवाला देऊन त्यांनी दावा केला की माजी पंतप्रधान इम्रान खान यांची “गूढपणे हत्या करण्यात आली असून त्यांचा मृतदेह तुरुंगाबाहेर हलवण्यात आला आहे.”

मात्र ते खरे नव्हते कारण आदियाला तुरुंग अधिकाऱ्यांनी नंतर स्पष्ट केले की “आदियाला तुरुंगातून त्यांच्या हलवण्याच्या वृत्तात काहीही तथ्य नाही. ते पूर्णपणे निरोगी आहेत आणि त्यांना पूर्ण वैद्यकीय मदत मिळत आहे.”

नंतर, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही दावा केला की इम्रान खान यांना “प्रीमियम सुविधा मिळत आहेत. त्यांच्याकडे जाणाऱ्या जेवणाचा मेनू तपासा, तो मेन्यू पंचतारांकित हॉटेलमध्येही उपलब्ध नाही.”

त्यांनी असाही दावा केला की खान “मखमली गादीवर” झोपतात.

अफगाणिस्तान टाईम्सचा वृत्तांत आणि तो ज्या पद्धतीने पसरला त्याचे मूळ कदाचित त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि पक्षाच्या सहकाऱ्यांना त्यांना भेटू न देण्यावरून असावे. असे म्हटले जाते की, त्यावर उपाय केले जात आहेत, परंतु ज्या पद्धतीने खान यांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त पसरले ते दुसऱ्याच गोष्टीकडे निर्देश करते.

पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी नेत्यांचे यापूर्वीही गूढ मृत्यू झाले आहेत. पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची ऑक्टोबर 1951 मध्ये रावळपिंडी येथे एका सभेत भाषण करताना एका अफगाण नागरिकाने हत्या केली होती. पोलिसांनी हल्लेखोराला ठार मारल्यामुळे पंतप्रधानांना मारण्याचा त्याचा हेतू अजूनही गुलदस्त्यातच आहे.

लोकप्रिय पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना एका राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आणि 1979 मध्ये त्यांना फाशी देण्यात आली. त्यांचा खटला आणि फाशी लष्करी कायद्याअंतर्गत झाली.

त्यांना फाशी देणारा माणूस जो नंतर देश चालवणारा लष्करप्रमुख बनला त्या जनरल झिया उल-हक यांचा मृत्यू ऑगस्ट 1988 मध्ये ते प्रवास करत असलेले विमान कोसळून झाला. आजपर्यंत, विमान का आणि कसे कोसळले याचा शोध लागलेला नाही. अर्थात त्याबद्दलच्या अफवा मात्र मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत.

पाकिस्तानी लष्कराचे केंद्र असलेल्या रावळपिंडी येथे एका रॅलीत पाकिस्तानी तालिबानच्या आत्मघातकी बॉम्बरने बेनझीर भुट्टो यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. माजी लष्करी हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी त्यांना मारले असे अनेकजण मानतात. पाकिस्तानी तालिबान तेव्हा लष्कराचाच एक भाग होता.

इम्रान खान यांच्या रेकॉर्डवरील म्हणण्यानुसार जर आपला तुरुंगात मृत्यू झाला तर असीम मुनीर हाच तो माणूस असेल ज्याला जबाबदार धरले पाहिजे. यात काही शंका नाही की मुनीर यांच्यासाठी, तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान हे सर्वात मोठा धोका आहेत. पण ते असे टोकाचे पाऊल उचलतील का आणि त्यानंतर जे काही घडेल त्यातून आपण वाचू अशी अपेक्षा ते करतील का? इतिहासातून याबद्दल सर्वोत्तम मार्गदर्शन मिळेल.

ऐश्वर्या पारीख  

+ posts
Previous articleतंत्रज्ञानात्मक औद्योगिक शक्तीसाठी चिनी संकरीत संरक्षण मॉडेलची गरज
Next articleसीरियन गावात इस्रायली सैन्याचा छापा; संशयित दहशतवाद्यांना घेतले ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here