ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या विमानांचे नुकसान झाल्याची सीडीएस यांची कबुली

0

या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानशी झालेल्या संघर्षाच्या पहिल्याच दिवशी भारताच्या विमानांचे नुकसान झाल्याच्या बातमीला सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी दुजोरा दिला.

सिंगापूरमधील शांग्री-ला डायलॉगदरम्यान, जनरल चौहान यांनी ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत लढाऊ विमानांच्या नुकसानीचा उल्लेख केला; अर्थात किती विमानांचे नुकसान झाले ते मात्र सांगितले नाही.

पाकिस्तानच्या दाव्यांचे खंडन

“यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमान खाली पडणे नसून ते का खाली पडत होते हे पाहणे आहे,” असे चौहान म्हणाले. या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले होते की पाकिस्तानने भारताची सहा लढाऊ विमाने पाडली आहेत. मात्र, सीडीएस जनरल चौहान यांनी मात्र या दाव्यांचे खंडन केले आहे.

“चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला आमची चूक समजली, ती दुरुस्त केली, ती दुरुस्त झाली आणि नंतर दोन दिवसांनी ती गोष्ट पुन्हा अंमलात आणली आणि आमची सर्व विमाने पुन्हा लांब पल्ल्याची लक्ष्ये गाठण्यासाठी उडाली. म्हणून 7, 8 आणि 10 तारखेला मोठ्या संख्येने पाकिस्तानमध्ये घुसत त्यांच्या हवाई तळांवर हल्ला करण्यासाठी आम्ही परतलो, त्यांच्या सर्व हवाई संरक्षण यंत्रणेत निर्भयपणे घुसखोरी केली आणि अचूक हल्ले केले,” असे ते पुढे म्हणाले.

जनरल चौहान यांनी पुष्टी केली की भारतीय हवाई दलाने “10 तारखेला सर्व प्रकारच्या विमानांचे सर्व प्रकारच्या नियमांसह उड्डाण केले होते.”

भारताचे हवाई ऑपरेशन्सचे महासंचालक एअर मार्शल ए.के. भारती यांनी महिन्याच्या सुरुवातीला पत्रकार परिषदेत सांगितले होते की “नुकसान हा युद्धाचा भाग आहे” आणि भारताने काही पाकिस्तानी विमाने पाडली आहेत.

आण्विक चिंता असतानाही संघर्ष विराम?

भारत आणि पाकिस्तानमधील हा संघर्ष गेल्या अर्ध्या शतकातील अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील सर्वात वाईट संघर्ष होता. 22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी केलेल्या भयानक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. धर्माच्या आधारे सशस्त्र दहशतवाद्यांनी 26 नागरिकांची हत्या केली. भारताने प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू केले, जिथे त्यांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला केला, त्यानंतर पाकिस्तानने या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे संघर्ष निर्माण झाला.

दोन्ही देशांना अण्वस्त्र युद्ध टाळण्यास मदत करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांमधील सहभागाबाबत विचारलेल्या प्रश्नावर जनरल चौहान म्हणाले, “मला वाटते की तो अण्वस्त्र युद्धाचा उंबरठा ओलांडण्याआधी  खूप उपाय आहेत, त्यापूर्वी बरेच संकेता़चे पालन करणे आवश्यक असते. मला वाटते की असे काहीही घडले नाही.” ते पुढे म्हणाले, “तयार केलेल्या पारंपरिक कामगिरीसाठी भरपूर जागा तयार केली गेली आहे आणि हीच नवीन पद्धत असेल.”

चौहान आणि पाकिस्तानचे जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी म्हटले आहे की या संघर्षादरम्यान कोणत्याही वेळी अण्वस्त्रांचा वापर करण्याचा विचार केला गेला नव्हता.

“माझे वैयक्तिक मत आहे की संघर्ष होतो तेव्हा गणवेशातील लोक सर्वात विवेकी असतात,” असे ते पुढे म्हणाले. या कारवाईदरम्यान, मी दोन्ही बाजूंना त्यांच्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये लक्षणीय तर्कशुद्धता दाखवताना पाहिले. मग आपण असे का गृहीत धरावे की अण्वस्त्र क्षेत्रात दुसऱ्या बाजूने अविवेकीपणा असेल?”

चीनचा सहभाग

चौहान यांनी असेही स्पष्ट केले की, जरी पाकिस्तानचा चीनशी जवळचा संबंध असला – जो उत्तर आणि पूर्वेला भारताच्या सीमेला लागून आहे – तरी या संघर्षादरम्यान बीजिंगकडून पाकिस्तानला प्रत्यक्ष मदत मिळाल्याचे कोणतेही चिन्ह नव्हते.

“22 एप्रिलपासून हे सर्व घडत असताना, आम्हाला आमच्या उत्तर सीमेच्या ऑपरेशनल किंवा सामरिक टेहळीमध्ये कोणतीही असामान्य हालचाल आढळली नाही आणि सर्वसाधारणपणे सर्व काही ठीक होते.”

चीनने संघर्षादरम्यान पाकिस्तानला कोणतीही उपग्रह प्रतिमा किंवा इतर real time गुप्तचर माहिती पुरवली असेल का? असे विचारले असता, चौहान म्हणाले की अशा प्रतिमा व्यावसायिकरित्या उपलब्ध होत्या आणि त्या चीन तसेच इतर स्रोतांकडून मिळवता आल्या असत्या.

ते पुढे म्हणाले की, संघर्ष थांबला असला तरी, भारत सरकारने स्पष्ट केले आहे की “पाकिस्तानकडून आणखी कोणतेही दहशतवादी हल्ले झाल्यास तो अधिक अचूक आणि निर्णायक प्रत्युत्तर देईल.”

“त्यामुळे सशस्त्र दलांच्या बाबतीत त्यांची स्वतःची कार्य करण्याची एक गतिशीलता आहे. मात्र त्यासाठी आपल्याला 24/7 तयार असणे आवश्यक आहे.”

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleयुद्ध सुरू झाल्यापासून गाझामधील परिस्थिती सर्वाधिक वाईट, दुष्काळाचे सावट
Next articleIndian Army Conducts Trials Of Next-Gen Defence Technologies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here