युद्ध सुरू झाल्यापासून गाझामधील परिस्थिती सर्वाधिक वाईट, दुष्काळाचे सावट

0

19 महिन्यांपूर्वी इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून गाझामधील मानवतावादी मदत परिस्थिती अतिशय वाईट बनल्याचे संयुक्त राष्ट्रांनी (UN) शुक्रवारी सांगितले. इस्रायली सैन्याने वेढलेल्या पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये मदत वितरण मर्यादित प्रमाणात सुरू झाले असूनही दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.

वाढत्या जागतिक दबावामुळे, इस्रायलने 12 दिवसांपूर्वी गाझावरील 11 आठवड्यांची नाकेबंदी संपवली, ज्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखालील मर्यादित मदतकार्याला पुन्हा सुरू होऊ शकली. त्यानंतर सोमवारी, मदत वितरणासाठी एक वादग्रस्त नवीन केंद्र देखील सुरू करण्यात आले – गाझा मानवतावादी फाउंडेशन, ज्याला अमेरिका आणि इस्रायलचा पाठिंबा आहे.

“ज्यांना गरज आहे त्यांच्या हाताला कोणतीही मिळालेली मदत  चांगलीच असते,” असे संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी न्यू यॉर्कमध्ये पत्रकारांना सांगितले. परंतु, त्यांनी पुढे सांगितले की, आतापर्यंतच्या मदत वितरणाचा “खूपच, अतिशय कमी परिणाम झाल्याचे बघायला मिळाले आहे.”

“युद्ध सुरू झाल्यापासून गाझामधील आपत्तीजनक परिस्थिती सर्वाधिक वाईट आहे,” असे ते म्हणाले.

संयुक्त राष्ट्र विरुद्ध GHF

संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय मदत गटांनी GHF सोबत काम करण्यास नकार दिला आहे. त्यांच्या मते GHF तटस्थ नाही आणि पॅलेस्टिनींना विस्थापित करण्यास भाग पाडणारे वितरण मॉडेल ते राबवत आहेत.

इस्रायलला शेवटी संयुक्त राष्ट्रांनी GHF द्वारे काम करावे अशी इच्छा आहे, जी तथाकथित सुरक्षित वितरण स्थळांवर नागरी संघांद्वारे वितरणासाठी गाझामध्ये मदत पोहोचवण्यासाठी खाजगी अमेरिकन सुरक्षा आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांचा वापर करत आहे.

मात्र, इस्रायल संयुक्त राष्ट्र आणि GHF दोन्ही कामगिरीद्वारे “तात्काळ भविष्यासाठी” मदत वितरणास परवानगी देईल, असे इस्रायलचे संयुक्त राष्ट्र राजदूत डॅनन डॅनन यांनी या आठवड्यात सांगितले. GHF ने शुक्रवारी सांगितले की त्यांनी आतापर्यंत 2.1 दशलक्षाहून अधिक जेवण वितरित करण्यात यश मिळवले आहे.

इस्रायलने हमासवर मदत चोरल्याचा बराच काळ आरोप केला आहे हमासने मात्र हा आरोप नाकारला आहे.

2023 पासून गाझामधील युद्ध सुरू आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलमध्ये 1 हजार 200 नागरिकांची केलेली हत्या केली आणि सुमारे 250 नागरिकांना ओलिस ठेवल्यानंतर या संघर्षाला सुरूवात झाली, असे इस्रायली आकडेवारीवरून दिसून येते. गाझा आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने लष्करी मोहिमेला प्रत्युत्तर दिले ज्यामध्ये 54 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.

लूटमार, प्रवेश

असुरक्षितता आणि इस्रायली प्रवेश निर्बंधांमुळे गेल्या 12 दिवसांत, त्यांना गाझामध्ये फक्त 200 ट्रक भरून मदत पोहोचवता आली आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. या मदतीचा किती भाग गरजू लोकांपर्यंत पोहोचला हे लगेच स्पष्ट झालेले नाही. काही ट्रक्स आणि जागतिक अन्न कार्यक्रमाचे गोदाम देखील हताश, भुकेल्या लोकांनी लुटले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी इस्रायल कोणत्या प्रकारची मदत देऊ शकते यावर असलेल्या मर्यादांवरही टीका केली आहे.

“इस्रायली अधिकाऱ्यांनी आम्हाला एकही तयार जेवण आणण्याची परवानगी दिलेली नाही. बेकरींसाठी परवानगी असलेला एकमेव पदार्थ म्हणजे पीठ. अमर्याद प्रमाणात परवानगी दिली  तरी -जी अद्याप देण्यात आलेली नाही – तरीही ते कोणासाठीही पूर्ण आहार ठरणार नाही,” असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी व्यवहार प्रवक्त्या एरी कानेको यांनी सांगितले.

GHF कडून मदत मिळालेल्यापैकी काहींनी सांगितले की पॅकेजमध्ये काही तांदूळ, पीठ, बीन्सचा कॅन, पास्ता, ऑलिव्ह ऑइल, बिस्किटे आणि साखर यांचा समावेश आहे.

एका गुंतागुंतीच्या प्रक्रियेअंतर्गत, इस्रायल या मदत शिपमेंटची तपासणी करतो, जी नंतर केरेम शालोम क्रॉसिंगच्या पॅलेस्टिनी बाजूला नेली जाते. तेथे, मदत उतरवली जाते आणि नंतर गाझामधील गोदामांमध्ये नेण्यासाठी इतर ट्रकमध्ये पुन्हा लोड केली जाते.

केरेम शालोमच्या पॅलेस्टिनी बाजूने सध्या मदतीचे शेकडो ट्रक संयुक्त राष्ट्रांच्या संकलनाची वाट पाहत आहेत.

“जर तुम्ही क्रॉसिंगवर तुमची वाट पाहत असलेली मदत गोळा केली तर अधिक मदत प्रत्यक्षात लोकांना मिळेल,” इस्रायली लष्करी मदत समन्वय संस्था COGAT ने शुक्रवारी X वर दिलेल्या पोस्टमध्ये संयुक्त राष्ट्रांना सांगितले.

संयुक्त राष्ट्रांनी मात्र म्हटले आहे की मंगळवारी, इस्रायली सैन्याने मदत घेण्यासाठी केरेम शालोममध्ये जाण्याच्या सर्व विनंत्या नाकारल्या. आणि गुरुवारी, जेव्हा मदतीचे 65 ट्रक क्रॉसिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात यशस्वी झाले, तेव्हा तीव्र लढाईमुळे पाच वगळता सर्व ट्रक परतले.

वैद्यकीय मदतीचे पाच ट्रक एका फील्ड हॉस्पिटलच्या गोदामांमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाले, परंतु “सशस्त्र व्यक्तींच्या एका गटाने गोदामांवर हल्ला केला… कुपोषित मुलांसाठी असलेल्या वैद्यकीय उपकरणे, साहित्य, औषधे आणि पौष्टिक पूरक पदार्थांची मोठ्या प्रमाणात लूट केली,” असे दुजारिक म्हणाले.

युद्धविराम प्रस्ताव

इस्रायलने म्हटले आहे की ते सर्व मदत वितरण सुलभ करत आहे. COGAT ने या आठवड्यात म्हटले आहे की युद्धाला सुरूवात झाल्यापासून 1.3 दशलक्ष टन अन्नासह 1.8 दशलक्ष टन मदत गाझामध्ये पोहोचली आहे.

संघर्षात 60 दिवसांच्या युद्धबंदीसाठी अमेरिकेचा प्रस्ताव – इस्रायलने स्वीकारला आणि सध्या हमास त्यावर विचार करत आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्र, रेड क्रेसेंट आणि इतर मान्य माध्यमांद्वारे मानवतावादी मदत पोहोचवली जाईल.

मार्चमध्ये इस्रायलने पुन्हा लष्करी कारवाई सुरू केल्यावर संपलेल्या दोन महिन्यांच्या युद्धबंदी दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की त्यांना गाझामध्ये दररोज 600 ते 700 ट्रक मदत मिळत आहे. जेव्हा लोकांना कळते की मदतीचा ओघ सतत सुरू आहे तेव्हा लूट कमी होते.

“अराजकता रोखण्यासाठी, मदतीचा ओघ स्थिरपणे आला पाहिजे,” असे संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका आणि पूर्व युरोप संचालक कोरिन फ्लेशर यांनी गुरुवारी एक्सवर पोस्ट केले.

“जेव्हा लोकांना अन्न येत आहे हे कळते तेव्हा निराश वातावरण शांततेत बदलते.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleCDS Confirms Aircraft Losses, Dismisses Nuclear War Concerns
Next articleऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या विमानांचे नुकसान झाल्याची सीडीएस यांची कबुली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here