चीन: तरुण पीएलए सैनिक तिबेटमध्ये सेवा देण्यास अनुत्सुक

0

तिबेटस्थित पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ब्रिगेडमध्ये सेवा करण्यास नकार दिल्याबद्दल शिक्षा झालेल्या एका तरुण सैनिकावरून चिनी नेटकऱ्यांमध्ये वाद सुरू आहे.  वेइबोसारख्या चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही घटना एक ट्रेंडिंग विषय बनली असून, त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

वेइबोवर, #Official Notice: Huang Moumou Refused Military Service हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता, तो रिलीज झाल्यानंतर काही तासांतच 29.6 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि 4 हजार 200 हून अधिक नेटकऱ्यांनी त्यावर चर्चा केली.

हुआंग मौमो असे या सैनिकाचे नाव असून तो ग्वांगझू येथील विद्यापीठाचा पदवीधर आहे. मार्च 2025 मध्ये तो स्वेच्छेने सैन्यात भरती झाला होता, परंतु त्याच्या सेवा नोंदीनुसार, तिबेटमध्ये नियुक्त झाल्यानंतर त्याचा तिथे रुजू व्हायला “नकार दिला”. वारंवार समुपदेशन करूनही, हुआंग परिस्थितीशी जुळवून घेऊ शकला नाही, त्याचा नकार कायम राहिला. परिणामी त्याला सैन्यातून काढून टाकण्यात आले.

त्याला सुमारे 4 हजार अमेरिकन डॉलर्स एवढ्या रकमेचा युआन दंड ठोठावण्यात आला असून सैनिकांच्या कुटुंबाला मिळणारे सगळे फायदे काढून घेण्यात आले आहेत. याशिवाय सार्वजनिक नोकरी, परदेश प्रवास आणि उच्च शिक्षण घेण्यापासून त्याच्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. त्याच्या या अपयशी लष्करी कारकिर्दीची माहिती त्याच्या घरगुती नोंदणी आणि वैयक्तिक क्रेडिट फाइलमध्ये देखील नोंदवली जाईल, ज्यामुळे त्याला आयुष्यभर लष्करी डिफॉल्टर म्हणून घोषित करण्यात येईल.

तिबेटमधील पोस्टिंग: कष्टाचे प्रतीक

हुआंगचा खटला लष्करी अवज्ञा केली इतका साधा होता का? ऑनलाइन प्रतिक्रियांपैकी अनेक एका मुद्द्यावर केंद्रित होत्या तो म्हणजे: तिबेटमध्ये तैनात होण्याची भीती, जी चिनी सैन्यातील सर्वात कठीण पोस्टिंगपैकी एक असते.

एका व्हायरल कमेंटचा सारांश असा होता: “त्याला कदाचित तिबेटला पाठवले जात आहे हे माहित होते आणि तो त्रास सहन करू इच्छित नव्हता.”

उंच उंचीवरील पोस्ट, गोठवणारे वारे आणि एकाकीपणासाठी ओळखले जाणारे तिबेट, पीएलएमधील सर्वात कठीण पोस्टिंगपैकी एक म्हणून पाहिले जाते. राज्य माध्यमे या ठिकाणी झालेले पोस्टिंग म्हणजे वीरतापूर्ण घटना म्हणतात परंतु भरती झालेल्या अनेक तरुण सैनिकांचे मत वेगवेगळी आहेत.

यावरील टिप्पण्यांनी वेइबो ओसंडून वाहताना दिसते. काही  पोस्टमध्ये याबद्दल विनोद केल्याचे बघायला मिळते, तर काहींनी तिथे कसे जाणे टाळावे याबद्दल सल्ला दिला. टॅटोने एका वेरिफाईड खात्याची शिफारस केली आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की “जर एखाद्याला खरोखर सेवा द्यायची नसेल, तर ते वैद्यकीय तपासणी दरम्यान सहजपणे ते टाळू शकतात, तिथे असे भासवू शकतात की तुम्ही डोळ्यांनी समोरचा चार्ट वाचू शकत नाही किंवा लहान टॅटू दाखवू शकत नाही आणि तुम्हाला सवलत दिली जाईल.” (खालील स्क्रीनशॉट)

पण जसे विरोधक असतात तसे नेहमीच “लिटल पिंक्स” म्हणजे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) तरुण, निष्ठावंत समर्थक. ते सरकार आणि पीएलएचे समर्थन करण्यासाठी अशा ऑनलाइन वादविवादांमध्ये उडी घेण्यासाठी ओळखले जातात.

एका लिटल पिंकने लिहिले: “हुआंग मौमो याला लष्करी सेवेला नकार दिल्याबद्दल हद्दपार करण्यात आले आहे आणि कायमचे चिन्हांकित करण्यात आले आहे, सार्वजनिक परीक्षा देण्यासाठी त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. कायद्याची लाल रेषा म्हणजे विनोद नाही, असे निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.”

परंतु अनेक तरुण युजर्स तिबेटमधील कठोर जीवनाबद्दल चिंतेत होते, कायद्याबद्दल नाही. एका टिप्पणीत “मला सैन्यात सामील व्हायचे आहे, पण मला अशा त्रासांची भीती वाटते,” असे म्हटले आहे.

पोस्टवरून असे दिसून आले की नॅशनलिस्ट अजूनही ऑनलाइन चर्चेवर नियंत्रण ठेवत असले, तरी तिबेटमध्ये सेवा करण्याबाबत तरुण लोक त्यांचे विचार जाहीर करण्यासाठी शिक्षा पत्करण्याचा धोका पत्करत आहेत. अर्थात खूपच कमी लोक उघडपणे त्यांचा बचाव करण्याचे धाडस करत होते, त्यांच्या कमी लेखलेल्या या टिप्पण्या सैन्यात भरती केलेल्या सैनिकांकडून नेमकी कशाची अपेक्षा केली जात आहे याबद्दल अधिक अस्वस्थता दर्शवितात.

वेइबोवरील व्यापक ट्रेंडवरून असे दिसून येते की चीनचे तरुण पीएलएमध्ये सामील होण्यास वाढत्या प्रमाणात अनुत्सुक आहेत. अनेकांना, विशेषतः तिबेट आणि शिनजियांग सारख्या दुर्गम प्रदेशातील लष्करी जीवन कठोर, दूरचे आणि खूप नियंत्रित वाटते. जुन्या पिढ्यांमध्ये सन्मान म्हणून पाहिले जाणारे जीवन आता कठीण वाटते ज्यात: लांब अंतर आणि वेगळेपणा, थंड हवामान आणि मर्यादित वैयक्तिक स्वातंत्र्य यांचा समावेश होतो.

डिजिटल आणि शहरी जीवनाच्या युगात वाढलेले तरुण चिनी लोक, विशेषत: तिबेटसारख्या ठिकाणी, जिथे परिस्थिती शरीर आणि मन दोन्हीची परीक्षा घेते, पीएलएची व्याख्या करणारी कठोर शिस्त आणि अडचणी स्वीकारण्यास अनेकदा संघर्ष करतात. काही नेटिझन्सनी असा युक्तिवाद केला की स्वेच्छेने भरती होणे अधिक मजबूत मानसिक आधारासह आले पाहिजे, असे म्हणत की अशा वातावरणात केवळ देशभक्तीच्या घोषणा मनोबल टिकवून ठेवू शकत नाहीत.

ही कथा निष्ठा आणि त्यागाची मागणी करणारे सरकार आणि मानसिक आरोग्य, आराम आणि वैयक्तिक निवडीवर अधिक लक्ष केंद्रित करणारी तरुण पिढी यांच्यातील पिढ्यानपिढ्यांचा फरक प्रतिबिंबित करणारी आहे.

रेशम

+ posts
Previous articleरोल्स-रॉईसची विविध उपक्रमांसह, भारतात धोरणात्मक विस्ताराची योजना
Next articleउत्तर कोरियाने लष्करी परेडमध्ये, नवीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे अनावरण केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here