भारत आणि पाकिस्तानचे मिलिटरी ऑपरेशन्स प्रमुख सोमवारी पुढील पावले उचलण्यासाठी भेटणार असल्याचे भारताकडून रविवारी सांगण्यात आले. युद्धबंदीमुळे सीमेवर शांतता प्रस्थापित झाली असून गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे, त्यामुळे दोन्ही देशांच्या शेअर बाजारांमध्ये सुधारणा झाली आहे.
शनिवारच्या संघर्षविराम उल्लंघनानंतर रविवारी रात्री स्फोट किंवा गोळीबाराचे कोणतेही वृत्त आले नाही, भारतीय लष्कराने म्हटले आहे की रविवारी सीमेवर अलिकडच्या दिवसांतील पहिली शांततापूर्ण रात्र होती.अर्थात शांततापूर्ण वातावरण असले तरी काही शाळा अजूनही बंद आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी भारत पाकिस्तान यांच्यात संघर्षविराम सुरू झाल्याचे जाहीर केले. चार दिवसांच्या तीव्र गोळीबार, राजनैतिक हालचाली आणि वॉशिंग्टनच्या दबावानंतर ही संघर्षविराम लागू झाला.
भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानला मागील दिवसाच्या संघर्षविरामाच्या उल्लंघनांबद्दल “हॉटलाइन” मेसेज पाठवला, ज्यामुळे अशा घटनांना पुन्हा प्रत्युत्तर देण्याचा नवी दिल्लीचा हेतू स्पष्ट झाला, असे एका वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
पाकिस्तानच्या लष्कराच्या प्रवक्त्याने कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झाल्याचा इन्कार केला.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी एका निवेदनात सांगितले की, दोन्ही बाजूंचे मिलीटरी ऑपरेशन्सचे महासंचालक सोमवारी दुपारी 12 वाजता (06.30 GMT) एकमेकांशी परत चर्चा करणार आहेत.
रॉयटर्सने चर्चेवरील टिप्पणीसाठी केलेल्या विनंतीला पाकिस्तानने लगेच प्रतिसाद दिला नाही.
गेल्या महिन्यात जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये 25 पर्यटकांचा मृत्यू झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी भारताने पाकिस्तानला दोषी ठरवल्यानंतर उभय देशांमधील संबंध बिघडले. या कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांच्या लष्करी प्रतिष्ठानांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने लक्ष्य केले होते, ज्यामध्ये डझनभर नागरिकांचा मृत्यू झाला होता.
पाकिस्तानने या दहशतवादी हल्ल्यात आपला हात असल्याचे आरोप फेटाळले आहेत आणि तटस्थ चौकशीची मागणी केली आहे.
भारताने बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये नऊ ‘दहशतवादी पायाभूत सुविधा’ स्थळांवर हल्ले केल्याचे म्हटले आहे, परंतु इस्लामाबादने म्हटले आहे की ही नागरी स्थळे आहेत.
स्टॉक मार्केटवर परिणाम
सोमवारी पाकिस्तानचा बेंचमार्क शेअर इंडेक्स जवळपास 9 टक्क्यांनी वाढल्यानंतर पाकिस्तानने एक तासासाठी व्यवहार थांबवला, भारताच्या हल्ल्यांनंतर गेल्या तीन सत्रांमध्ये झालेल्या नुकसानीपैकी बहुतेक नुकसान भरून काढले आहे.
शुक्रवारी उशिरा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्यांच्या हवामान लवचिकता निधी अंतर्गत पाकिस्तानला 1.4 अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मंजूर केले आणि त्यांच्या 7 अब्ज डॉलर्सच्या कार्यक्रमाचा पहिला आढावा मंजूर केला.
निफ्टी इंडेक्सने मागील तीन सत्रांमध्ये 1.5 टक्क्यांची घसरण केल्यानंतर, सुरुवातीच्या व्यापारात भारतीय बेंचमार्क सुमारे 2.5 टक्क्यांनी वाढले. संघर्षाच्या चिंतेमुळे शुक्रवारपर्यंतच्या दोन दिवसांत इक्विटीजमधून ८३ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.
इस्लामाबादने संघर्षविरामाला चालना दिल्याबद्दल वॉशिंग्टनचे आभार मानले आहेत आणि भारतासोबत काश्मीर वादावर मध्यस्थी करण्याच्या ट्रम्प यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले आहे, तर नवी दिल्लीने संघर्षविराम किंवा तटस्थ ठिकाणी चर्चेत अमेरिकेच्या सहभागावर भाष्य केलेले नाही.
22 एप्रिलच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देणाऱ्या भारतातील मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस पक्षाने पाकिस्तानसोबतच्या ताज्या घडामोडींवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
“काश्मीर मुद्द्यावर अमेरिकेने केलेल्या विधानांवर सरकारनेही आपली भूमिका मांडली पाहिजे, कारण हा द्विपक्षीय मुद्दा आहे,” असे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी रविवारी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
पाकिस्तानसोबतचे वाद थेट शेजाऱ्यांनी सोडवावेत असे म्हणणाऱ्या भारताने कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या सहभागाला नकार दिला आहे.
हिंदू बहुल भारत आणि इस्लामी पाकिस्तान हे दोघेही हिमालयातील काश्मीर प्रदेशाच्या काहीच भागांवर राज्य करत असले तरी दोघेही तो आपलाच प्रदेश असल्याचा दावा करतात.
1989 मध्ये सुरू झालेल्या काश्मीरच्या आपल्या भागात झालेल्या बंडखोरीसाठी भारत, पाकिस्तानला दोष देतो, तर दुसरीकडे पाकिस्तान म्हणतो की ते काश्मिरी फुटीरतावाद्यांना फक्त नैतिक, राजकीय आणि राजनैतिक पाठिंबा देत आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)