मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानातून ‘गाशा गुंडाळला’

0

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधील आपले मर्यादित कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे, ज्या निर्णयाचे अनेक भागधारकांनी शुक्रवारी देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने चिंताजनक बाब असल्याचे सांगितले आहे.

 

जागतिक संघटनात्मक पुनर्रचना आणि क्लाऊड-आधारित, भागीदार-चालित मॉडेलच्या दिशेने धोरणात्मक केंद्रबिंदू असल्याचे नमूद करून कंपनीने गुरुवारी अधिकृतपणे आपले पाकिस्तानमधील कार्यालय बंद केले आणि 25 वर्षांपासून तिथे असणारा आपला गाशा गुंडाळला.

ही घडामोड मायक्रोसॉफ्टच्या ताज्या जागतिक स्तरावर कपात करण्याच्या निर्णयाशी जुळणारी आहे. या कपातीमध्ये जगभरातील अंदाजे 9 हजार 100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय समाविष्ट आहे. त्याच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 4 टक्के एवढे कर्मचारी यामुळे घरी बसणार असून 2023 पासूनची मायक्रोसॉफ्टमधील ही मोठी कपात ठरली आहे.

सरकारी सहभागाची मागणी

मायक्रोसॉफ्टच्या पाकिस्तान शाखेचे माजी देश व्यवस्थापक जावेद रेहमान यांनी पाकिस्तानी सरकार आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांना अशा कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना पाकिस्तानात टिकवून ठेवण्यासाठी धाडसी, के. पी. आय.-चालित धोरणाद्वारे बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपन्यांशी सक्रियपणे संवाद साधण्याचे आवाहन केले.

एका लिंक्डइन पोस्टमध्ये रेहमान म्हणाले की, कंपनीचे कार्यालय बंद होणे हे पाकिस्तानचे आव्हानात्मक व्यावसायिक वातावरण प्रतिबिंबित करणारे असून मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक कंपनीला देखील सध्याच्या परिस्थितीत इथे काम करणे असुरक्षित वाटते.

‘त्रासदायक सूचक चिन्ह’

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आरिफ अल्वी यांनीही या घडामोडींवर चिंता व्यक्त केली आणि मायक्रोसॉफ्टचे जाणे हे पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहारांसाठी ‘त्रासदायक सूचक चिन्ह’ असल्याचे एक्सवर सामायिक केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

अल्वी यांनी उघड केले की मायक्रोसॉफ्टने एकदा पाकिस्तानमध्ये आपले कार्य विस्तारण्याचा विचार केला होता, परंतु राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे, कंपनीने 2022 च्या अखेरीस व्हिएतनामला आपले पसंतीचे ठिकाण म्हणून निवडले.

“ती संधी गमावली,” असे अल्वी यांनी आपल्या निवेदनात दु:ख  व्यक्त करत म्हटले आहे.

जावेद रेहमान यांनी स्पष्ट केले की मायक्रोसॉफ्टची पाकिस्तानातील उपस्थिती ही कधीही पूर्ण व्यावसायिक प्रक्रिया नव्हती. त्याऐवजी, कंपनीने प्रामुख्याने उद्योग, शिक्षण आणि सरकारी ग्राहकांना सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करणारी संपर्क कार्यालये सुरू केली होती.

अलिकडच्या वर्षांत, मायक्रोसॉफ्टचे बहुतेक स्थानिक व्यवहार आधीच अधिकृत भागीदारांकडे वळले होते, परवाना आणि कंत्राटी व्यवस्थापन आयर्लंडमधील त्याच्या युरोपियन केंद्राद्वारे हाताळले जात होते.

जागतिक पुनर्रचना उपक्रम

मायक्रोसॉफ्ट सध्या एक महत्त्वपूर्ण जागतिक पुनर्रचना उपक्रम हाती घेत आहे, ज्यामध्ये कार्यबल कमी करणे आणि त्याच्या कामकाजाची धोरणात्मक पुनर्रचना समाविष्ट आहे.

कंपनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड-केंद्रित, भागीदार-चालित व्यवसाय मॉडेलकडे वळण्याचा एक भाग आहे.

वाढत्या आव्हानात्मक जागतिक बाजारपेठेत परिचालन कार्यक्षमता सुधारणे, संसाधनांचे वाटप अनुकूल करणे आणि स्पर्धात्मकता वाढवणे हे या पुनर्रचनेचे उद्दिष्ट आहे. मायक्रोसॉफ्ट कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.), क्लाउड कॉम्प्युटिंग आणि एंटरप्राइझ सोल्यूशन्स यासारख्या क्षेत्रांवर अधिक भर देत आहे, तर कमी टिकाऊ किंवा त्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी सुसंगत मानल्या जाणाऱ्या प्रदेशांमध्ये किंवा व्यवसाय विभागांमध्ये त्याची उपस्थिती कमी करत आहे.

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यापक प्रवाहाच्या दरम्यान नोकर कपातीची ही लाट आली आहे, जिथे कंपन्या आर्थिक अनिश्चितता, बदलत्या बाजारपेठेची गतिशीलता आणि ग्राहकांच्या बदलत्या मागण्यांमुळे त्यांच्या कामकाजाचे पुनर्मूल्यांकन करत आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleभारताची 234 दशलक्ष डॉलर्सच्या ड्रोन प्रोत्साहन कार्यक्रमाची योजना
Next articleJapan To Export Old Destroyers To Philippines To Deter China

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here