पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

0

अँटवर्पमध्ये राहणाऱ्या फरार भारतीय हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममधील पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला शनिवारी अटक करण्यात आली असून सध्या त्याला तुरुंगात टाकण्यात आले.

त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी बेल्जियमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. बेल्जियमची नागरिक असलेल्या पत्नी प्रीतिसह मेहुल अँटवर्पमध्ये राहत होता.

पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) 13 हजार 850 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) चोक्सी हवा आहे.

तो आधी अँटिगा आणि बार्बुडा येथे राहत असल्याचे मानले जात होते. मात्र अँटिगाचे नागरिकत्व धारण करत असतानाच त्याने वैद्यकीय उपचारासाठी कॅरिबियन देश सोडला, असे अँटिगाचे परराष्ट्रमंत्री ई. पी. चेट ग्रीन यांनी 19 मार्च रोजी एएनआयला सांगितले.

65 वर्षीय हिरे व्यापारी असलेल्या मेहुल चोक्सी, बेल्जियन पत्नीच्या मदतीने मिळालेल्या ‘एफ रेसिडेन्सी कार्ड’ चा वापर करून 15 नोव्हेंबर 2023 पासून बेल्जियममध्ये राहत आहे.

हा निवासी दर्जा तृतीय-देशाच्या नागरिकाला त्यांच्या जोडीदारासह असल्यास विशिष्ट अटींनुसार बेल्जियममध्ये राहण्याची परवानगी देतो.

असोसिएट्स टाईम्सच्या म्हणण्यानुसार, चोक्सीने बेल्जियममध्ये राहण्यासाठी आणि प्रत्यार्पण टाळण्यासाठी कथितपणे खोट्या आणि बनावट कागदपत्रांचा वापर केला होता.

त्याने आपले भारतीय नागरिकत्व सोडले नसले तरी, बातम्यांवरून असे दिसून येते की जर त्याचा तात्पुरता निवास कायमस्वरूपी झाला तर त्याला संपूर्ण युरोपमध्ये अधिक प्रवासाचे स्वातंत्र्य मिळू शकेल, ज्यामुळे भारताला त्याच्याभोवती प्रत्यार्पण जाळे निर्माण करणे अधिक कठीण होईल.

विविध वृत्तांनुसार असे सूचित केले गेले आहे की चोक्सी हिर्सलँडेन क्लिनिक आराऊ या कर्करोग रुग्णालयात उपचारासाठी स्वित्झर्लंडला स्थलांतरित होण्याचा विचार करत होता.

भारतात परत पाठवणे टाळण्यासाठी तो मानवतावादी आधारांचा वापर करण्याचा प्रयत्न करू शकतो, असे अंदाज वर्तवले जात आहेत.

पीएनबी घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर चोक्सी जानेवारी 2018 मध्ये भारतातून पळून गेला. मे 2024 मध्ये, त्याने मुंबईच्या विशेष न्यायालयाला सांगितले की त्याची अनुपस्थिती “(माझ्या) नियंत्रणाबाहेरच्या कारणांमुळे” आहे, असा युक्तिवाद करत आपल्याला “फरार आर्थिक गुन्हेगार” असे लेबल लावू नये अशी विनंती त्याने केली होती.

ईडीने समन्स टाळल्याबद्दल आणि त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी त्याला फरारी घोषित करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता.

मे 2021 मध्ये, चोक्सी अँटिग्वामधून गायब झाला, ज्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी त्याचे अपहरण केले होते असा अंदाज बांधला गेला-हा आरोप नंतर तो डोमिनिकामध्ये सापडला तेव्हा फेटाळण्यात आला.

डिसेंबर 2024 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सांगितले की, चोक्सीसारख्या फरार आरोपींशी संबंधित कर्जाची परतफेड करण्यासाठी 22 हजार 280 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे किंवा विकण्यात आली आहे. दरम्यान, पीएनबी घोटाळ्यातील आरोपी असलेला त्याचा पुतण्या नीरव मोदी त्याच्या भारतात प्रत्यार्पणाविरूद्ध ब्रिटनमध्ये कायदेशीर लढाई लढत आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleउच्च-शक्तीच्या लेझर शस्त्राची चाचणी यशस्वी
Next articleचिनी जहाजाच्या कॅप्टनवर, समुद्राखालील केबल्स खराब केल्याचा तैवानचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here