राष्ट्रीय सुरक्षेच्या कारवाईमुळे पाच वर्षांपासून वाढत असलेल्या राजकीय दबावादरम्यान, हाँगकाँगच्या लीग ऑफ सोशल डेमोक्रॅट्सने (LSD) रविवारी पक्ष बरखास्तीची घोषणा केली. या निर्णयामुळे चीन शासित हॉंगकॉंगमध्ये आता लोकशाही समर्थक असा विरोधी पक्षच उरणार नाही.
गेल्या दोन वर्षांत हाँगकाँगमधील विसर्जित होमारा LSD हा तिसरा मोठा विरोधी पक्ष बनला आहे.
2006 मध्ये माजी कायदेकर्त्या लेउंग क्वोक-हंग यांनी लोकशाही समर्थक छावणीच्या कट्टरपंथी शाखेच्या रूपात सह-स्थापना केलेला, LSD हा या वर्षी लहान निदर्शने करणारा हाँगकाँगमधील शेवटचा गट ठरला.
2020 पर्यंत हाँगकाँगमध्ये राजकीय आणि नागरी समाज गटांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मेळावे आणि मोर्चे सामान्य होते, परंतु त्यानंतर खटल्याच्या धोक्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी संघटित निदर्शने बंद झाली आहेत.
चीनची घुसखोरी
पूर्वी ब्रिटीश वसाहतीचा भाग असणाऱ्या हॉंगकॉंगमध्ये चीनने 2020 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला, 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात लोकशाही समर्थक निदर्शनांनंतर विध्वंसासारख्या गुन्ह्यांना संभाव्य जन्मठेपेच्या शिक्षेची यात तरतूद करण्यात आली.
हॉंगकॉंगमधील बीजिंग समर्थक विधिमंडळाने 2024 मध्ये राजद्रोह आणि देशद्रोह यासारख्या गुन्ह्यांचा समावेश करून कलम 23 म्हणून ओळखला जाणारा कायद्यांचा दुसरा संच मंजूर केला होता.
‘असहमती कठोरपणे मोडून काढणे’
पक्षाचे सध्याचे अध्यक्ष चान पो-यिंग म्हणाले की या गटासमोर “कोणताही पर्याय उरलेला नाही” आणि पक्षाच्या सदस्यांच्या सुरक्षिततेचा विचार केल्यानंतर पक्ष विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णय घेण्यासाठी त्यांना कोणत्या दबावांचा सामना करावा लागला हे स्पष्ट करण्यास मात्र चान यांनी नकार दिला.
“नागरी समाजाचा होणारा ऱ्हास, तळागाळातील लोकांचा कमी होत जाणारा आवाज, लाल रेषांची सर्वव्यापकता आणि मतभेदांचे कठोर दमन पाहत असताना आम्ही अंतर्गत वाद आणि आमच्या नेतृत्वाला जवळजवळ पूर्णपणे तुरुंगवास यासारख्या गोष्टी सहन केल्या आहेत,” असे चान यांनी पत्रकारांना सांगितले, त्यांच्यासोबत त्सांग किन-शिंग, डिक्सन चाऊ, राफेल वोंग, फिगो चान आणि जिमी शाम हे सहा इतर प्रमुख सदस्य होते.
फेब्रुवारीमध्ये, शहरातील सर्वात मोठा आणि सर्वात लोकप्रिय विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने आपण पक्ष बरखास्त करत असल्याची घोषणा केली. अनेक वरिष्ठ सदस्यांनी रॉयटर्सला सांगितले की असे करण्यात ते अयशस्वी झाल्यास संभाव्य अटकेसह इतरही गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल असा इशारा बीजिंगने त्यांना दिला होता.
सरकारविरोधी शक्ती अजूनही शहराच्या कामकाजात हस्तक्षेप करत आहेत असा आरोप करत या महिन्याच्या सुरुवातीला, हाँगकाँगच्या प्रकरणांवरील चीनच्या सर्वोच्च अधिकारी झिया बाओलोंग यांनी राष्ट्रीय सुरक्षेचे काम सुरूच ठेवायला हवे यावर जोर दिला.
लीग ऑफ सोशल डेमोक्रॅट्स
LSD किंवा लीग ऑफ सोशल डेमोक्रॅट्स हा हाँगकाँगच्या लोकशाही समर्थक गटांपैकी एक असून तो सार्वत्रिक मताधिकार आणि सार्वत्रिक पेन्शन योजनेसह तळागाळातील लोकांच्या समस्यांच्या समर्थनात अधिक आक्रमक रणनीती आणि रस्त्यावरील निदर्शने यासाठी ओळखला जातो. 2016 च्या एका घटनेत, लेउंगने कायदेमंडळात हाँगकाँगचे माजी नेते लेउंग चुन-यिंग यांच्यावर एक गोल वस्तू फेकून मारली होती.
रस्त्यावर बूथ उभारल्याबद्दल दंडाधिकाऱ्यांनी 12 जून रोजी तीन LSD सदस्यांना दंड ठोठावला होता. या ठिकाणी काळे कापड फडकावून निषेध करण्यात आला होता आणि अधिकृत परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी पैसे गोळा केले गेले होते. चॅन यांनी पत्रकारांना सांगितले की 2023 मध्ये त्यांची अनेक बँक खाती बंद झाल्यानंतर पक्षाकडे विकण्यासाठी कोणतीही मालमत्ता आणि निधी शिल्लक राहिला नाही.
मध्यमवर्गीय डेमोक्रॅटिक पार्टी आणि सिव्हिक पार्टीइतकी लोकप्रियता LSD ला मिळाली नसली तरी, 2008 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तीन जागा मिळाल्या – ही त्यांची तोपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती.
LSD चे संस्थापक ६९ वर्षीय लेउंग यांना 2021 मध्ये ऐतिहासिक ’47 डेमोक्रॅट्स’ प्रकरणात विद्रोह करण्याचा कट रचल्याबद्दल अटक करण्यात आली होती. नंतर त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. ते सध्या सहा वर्षे आणि नऊ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. आणखी एक सदस्य जिमी शाम यांनाही त्याच प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला. मात्र मे महिन्यात त्यांची सुटका झाली.
शेकडोंना अटक
अमेरिका आणि ब्रिटनने हा सगळा प्रकार म्हणजे सुरक्षा कायद्यांवर दडपशाहीचे साधन म्हणून टीका केली आहे. तर चीनने म्हटले आहे की त्यांनी या कायद्यांअंतर्गत आतापर्यंत 332 लोकांना अटक करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
फिगो चॅन म्हणाले, “मला आशा आहे की हाँगकाँगचे लोक असुरक्षित लोकांकडे लक्ष देत राहतील आणि ते अन्यायासाठी आवाज उठवत राहतील.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)