दुर्मिळ योगायोगः विद्यमान लष्कर, नौदल प्रमुख एकाच शाळेचे माजी विद्यार्थी

0
एकाच
रीवा सैनिकी शाळेचे माजी विद्यार्थी

एकाच सैनिकी शाळेचे दोन माजी विद्यार्थी आपापल्या सेवादलाचे नेतृत्व करीत आहेत ही अलीकडच्या काळातली एक दुर्मिळ घटना आहे.

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, जे याआधी लष्कराचे उपप्रमुख (व्हीसीओएएस) होते, त्यांनी काल दुपारी जनरल मनोज पांडे यांच्याकडून भारतीय लष्कराचे 30 वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. 15 डिसेंबर 1984 रोजी 18 जम्मू आणि काश्मीर रायफल्समध्ये (जेएकेआरआयएफ) नियुक्त झालेले जनरल द्विवेदी हे सध्याच्या भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्यासारखेच मध्य प्रदेशातील रीवा येथील सैनिकी शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. अलीकडच्या काळात एकाच सैनिकी शाळेचे दोन माजी विद्यार्थी आपापल्या सेवादलाचे प्रमुख होणार ही एक दुर्मिळ घटना आहे.

मध्य प्रदेशातील रीवा येथील सैनिकी शाळेचे विद्यार्थी असलेले नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला इयत्ता 5 वी-अपासून शाळेत एकत्र होते. दोन वर्गमित्रांची सर्वोच्च पदावरील नियुक्तीही जवळपास एकाच वेळी, म्हणजे सुमारे एका महिन्याच्या अंतराने झाली आहे. ॲडमिरल यांनी 1 मे रोजी भारतीय नौदलाचा तर जनरल द्विवेदी यांनी 30 जून रोजी लष्कराचा पदभार स्वीकारला.

“भारतीय लष्करी इतिहासात प्रथमच, नौदल आणि लष्कर प्रमुख एकाच शाळेचे आहेत. 50 वर्षांनंतर आपापल्या सेवेचे नेतृत्व करणाऱ्या दोन विलक्षण विद्यार्थ्यांचे संगोपन करण्याचा हा दुर्मिळ सन्मान मध्य प्रदेशातील रीवा येथील सैनिकी शाळेला जातो,” असे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ए. भारत भूषण बाबू यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.


विशेष म्हणजे 2024च्या एप्रिलपर्यंत तत्कालीन नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि हवाई दल प्रमुख मार्शल व्ही. आर. चौधरी हे तिघेही एनडीएच्या एकाच बॅचचे माजी विद्यार्थी होते.  भविष्यात आणखी रोमांचक शक्यता आहे. दुर्मिळ योगायोग असा की, नजिकच्या काळात तीनही दलांचे प्रमुख मध्य प्रदेशातील रीवा येथील सैनिकी शाळेचे माजी विद्यार्थी असणार आहेत. एकाच शाळेतील तीन विद्यार्थी तीन दलांचे प्रमुख बनणं हा एक अद्वितीय आणि दुर्मिळ योगायोग आहे.

एकत्रित प्रशिक्षण आणि मैत्री यामुळे सध्या तिन्ही सशस्त्र दलांचे एकत्रीकरण, जॉईंटनेस आणि थिएटरायझेशन यासारख्या गुंतागुंतीच्या संरक्षण सुधारणांबाबत जे काम सुरू आहे ते सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने एक अद्वितीय समन्वय निर्माण करण्यास मदत होईल.

डॉ. रवी शंकर


+ posts
Previous articleIndian Navy Chief Visits Dhaka To Deepen Naval Ties
Next articleRussia Foils Ukrainian Drone Attack, Kyiv Seeks Better Defences Against Russian Glide Bombs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here