भारताच्या खासगी संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये प्रगतीचे एक नवे पाऊल पडले आहे. रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनीला, जर्मनीतील राईनमेटल वाफे म्युनिशन जीएमबीएचकडून, तब्बल ₹600 कोटींची निर्यात ऑर्डर मिळाली आहे. राईनमेटल ही जगातील आघाडीची संरक्षण उत्पादक कंपनी असून, यानिमित्ताने भारताच्या खासगी संरक्षण उत्पादन क्षेत्राला निश्चितच खूप मोठी चालना मिळाली आहे.
हा उच्च-मूल्य करार, भारतातील एखाद्या खासगी कंपनीसाठी हाय-टेक संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या निर्यात करारांपैकी एक आहे. हा करार रिलायन्स डिफेन्स आणि राईनमेटल यांच्यातील नुकत्याच जाहीर झालेल्या धोरणात्मक भागीदारीचा महत्त्वाचा टप्पा आहे. ही भागीदारी संरक्षण उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाला अधिक बळकटी देणारी आहे.
भारताच्या जागतिक संरक्षण विस्ताराला चालना
ही भागीदारी अशावेळी झाली आहे जेव्हा, भारत ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांद्वारे संरक्षण क्षेत्रात अधिक सक्षम होण्याचा प्रयत्न करत आहे. रिलायन्स डिफेन्सने म्हटले आहे की, “ही भागीदारी स्वदेशी क्षमतांना चालना देण्यासाठी आणि भारताला जागतिक संरक्षण पुरवठा साखळीत एक महत्त्वाचे केंद्र बनवण्यासाठी सामायिक बांधिलकी दर्शवते.”
राईनमेटल ए.जी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आर्मिन पॅपरगर यांनी सांगितले की, “अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपच्या नेतृत्वाखाली रिलायन्स डिफेन्ससोबतची ही धोरणात्मक भागीदारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतासोबत भागीदारी करण्याचा आमचा ठाम निश्चय दर्शवते.”
रिलायन्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिल डी. अंबानी म्हणाले की, “राईनमेटलसोबतची ही भागीदारी भारतात आघाडीचे संरक्षण तंत्रज्ञान घेऊन येते आणि भारताच्या खासगी संरक्षण क्षेत्रासाठी एक निर्णायक मैलाचा दगड ठरते. ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टीकोनाने प्रेरित होऊन, रिलायन्स डिफेन्सला जागतिक आघाडीच्या 3 संरक्षण निर्यातदारांमध्ये स्थान मिळवून देण्याचे आमचे लक्ष्य स्पष्ट आहे.”
महत्त्वाकांक्षी निर्यात योजना आणि धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी
रिलायन्स डिफेन्स, या नव्या कराराचा उपयोग विशेषतः युरोपमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी करणार आहे. कंपनीचा उद्देश अत्याधुनिक, एकत्रित उत्पादन संकुल उभारण्याचा आहे, जे ‘धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी (DADC)’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत उभारले जात आहे. हे संकुल महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद औद्योगिक क्षेत्रात उभारण्यात येत आहे. खासगी क्षेत्रातर्फे भारतात उभारले जाणारे हे सर्वात मोठे ग्रीनफिल्ड संरक्षण उत्पादन केंद्र असेल.
DADC मध्ये दारुगोळा, स्फोटके आणि लघु शस्त्रास्त्रांचे उत्पादन होईल. तसेच हे केंद्र भविष्यकालीन निर्यात-केंद्रित नवकल्पना आणि औद्योगिक क्षमतेचे केंद्र बनणार आहे.
भारताच्या संरक्षण निर्यातीसाठी एक धोरणात्मक झेप
राईनमेटल कंपनीची बाजार भांडवलाची किंमत सुमारे €80 अब्ज (₹7.99 लाख कोटी) असून, ही भागीदारी भारताच्या संरक्षण उत्पादन आणि निर्यात क्षेत्रातील वाढते स्थान ठळकपणे अधोरेखित करते. रिलायन्स डिफेन्सला मिळालेली ही निर्यात ऑर्डर केवळ कंपनीच्या तांत्रिक क्षमतेचीच नाही, तर भारतीय खासगी क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय संरक्षण मानकांमधील वाढत्या भूमिकेचीही पुष्टी करते.
हा करार भविष्यात संयुक्त उपक्रम, सह-विकास उपक्रम आणि विस्तारित संरक्षण निर्यातीसाठी मार्ग मोकळा करेल, अशी आशा आहे.
by, Huma Siddiqui