‘शाब्बास!’, Operation Sindoor साठी लष्करप्रमुखांकडून जवानांचे कौतुक

0

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, यांनी गुरुवारी श्रीनगर, उरी आणि उंची बसी येथील आघाडीच्या भागांना भेट दिली आणि Operation Sindoor दरम्यान दाखवलेल्या अपवादात्मक कामगिरीबद्दल भारतीय जवानांचे विशेष कौतुक केले.

यादरम्यान, त्यांनी चिनार कोरच्या डॅगर डिव्हिजनमधील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी विविध शस्त्रांच्या आणि सेवांच्या जवानांचे अभिनंदन केले, ज्यांनी LoC (नियंत्रण रेषा) वर हवाई आणि भूदल धोके निष्प्रभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

“शाब्बास!” अशी गर्जना करत, लष्करप्रमुखांनी जवानांचे शौर्य, सतर्कता आणि आक्रमक भूमिकेचे भरभरून कौतुक केले, विशेषतः भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर.

या भेटीत सैन्याच्या तांत्रिक अहवालांपेक्षा सैनिकांच्या मनोबलावर भर देण्यात आला. जनरल द्विवेदींनी, प्रेरणादायी संवादाच्या माध्यमातून जवानांचे धैर्य, व्यावसायिकता आणि मोहिमेतील यश यांचा गौरव केला.

ते म्हणाले की, “LoC पलीकडील पाकिस्तान-व्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये (PoJK) दहशतवादी अधिष्ठाने उद्ध्वस्त करणे ही ऑपरेशन सिंदूरची प्रमुख कामगिरी होती.”

त्यांच्या या दौऱ्याने लष्कराच्या सर्व स्तरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भारताच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असलेल्या सैनिकांच्या कर्तृत्वाल, सर्वोच्च लष्करी स्तरावरून सलामी मिळाली आहे.

जनरल द्विवेदी यांनी, त्यांच्या दौऱ्यात पाकिस्तानच्या अकारण गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना दिलेल्या मानवी सहकार्याचे विशेष उल्लेख करून जवानांचे आभार मानले.

ते म्हणाले की, “भारतीय लष्कर केवळ देशाच्या संरक्षणासाठीच नव्हे, तर नागरिकांच्या कल्याणासाठीही कटिबद्ध आहे.”

जनरल द्विवेदी यांनी पुढे सांगितले की, “भारतीय लष्कर, उद्भवणाऱ्या कोणत्याही आव्हानाला निर्णायक उत्तर देण्यासाठी नेहमीच सज्ज आहे. आपल्या सन्मान, शौर्य आणि कार्यक्षमतेच्या परंपरेमुळे आम्हाला सतत प्रेरणा मिळत असते.”

त्यांचा हा दौरा आघाडीवरील तुकड्यांसाठी मनोबलवर्धक ठरला आणि पश्चिम सीमेवरील बदलत्या सुरक्षापरिस्थितीत लष्करी नेतृत्व आणि जवान यांच्यातील दृढ नात्याची, यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रचिती दिली.

– टीम भारतशक्ती


+ posts
Previous article‘Shabash!’: Army Chief Lauds Troops for Operational Excellence During Operation Sindoor
Next articleCross-Border Hostilities Paused as India, Pakistan Prolong Truce

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here