अमेरिका समर्थित गाझा मदत योजनेत सहभागी होण्यास UN चा नकार

0

गाझामधील अमेरिकेच्या पाठिंब्याने चालवल्या जाणाऱ्या मानवतावादी मोहिमेत आपण सहभागी होणार नसल्याचे UN ने (संयुक्त राष्ट्रांनी) गुरुवारी जाहीर केले. या मोहिमेत निष्पक्षता, तटस्थता आणि स्वातंत्र्याचा अभाव आहे अशी चिंताही UN ने यावेळी व्यक्त केली. दरम्यान, इस्रायलने म्हटले आहे की ते या प्रयत्नांना पाठिंबा देईल परंतु थेट मदत वितरण योजना हाताळणार नाही.

“ही विशिष्ट वितरण योजना आमच्या मूलभूत तत्त्वांशी जुळत नाही, ज्यामध्ये निष्पक्षता, तटस्थता, स्वातंत्र्य यांचा समावेश आहे आणि आम्ही यात सहभागी होणार नाही,” असे UN चे उपप्रवक्ते फरहान हक यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले.

UN चे मदत प्रमुख टॉम फ्लेचर यांनी गाझामधील पॅलेस्टिनींच्या “पुढील हिंसाचार आणि विस्थापनासाठी अंजीराचे पान” (अत्यंत लाजिरवाणी किंवा अप्रिय गोष्ट लपविण्यासाठी) म्हणून केलेल्या जोरदार टीकेनंतर मदत योजनेअंतर्गत, अमेरिकेचा पाठिंबा असलेले गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन मे महिन्याच्या अखेरीस गाझामध्ये काम सुरू करेल.

मदत गटांकडून मिळणारी मदत गाझामध्ये पोहोचवण्यासाठी खासगी अमेरिकी सुरक्षा आणि लॉजिस्टिक कंपन्यांसोबत काम करण्याचा फाउंडेशनचा मानस आहे, असे एका सूत्राने सांगितले.

तुर्कीतील अंताल्या येथे पत्रकारांशी बोलताना, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी गुरुवारी टीका मान्य केली आणि सांगितले की “हमासला ती चोरता येणार नाही” अशाप्रकारे नागरिकांना मदत मिळवण्याच्या कोणत्याही पर्यायी योजनेसाठी वॉशिंग्टन तयार आहे.

गुरुवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी बोलल्यानंतर रुबिओ म्हणाले, “गाझा नागरिकांच्या दुःखापासून आम्ही मुक्त नाही किंवा कोणत्याही प्रकारे असंवेदनशील नाही. मला माहित आहे की त्यांना मदत करण्याच्या येथे संधी आहेत.”

“या योजनेवर टीका होत आहे. जर कोणाकडे अधिक चांगला पर्याय असेल तर आम्ही त्यासाठीही तयार आहोत,” असे ते म्हणाले.

UN च्या मानवतावादी व्यवहार समन्वय कार्यालयाने गुरुवारी सांगितले की, UN कडे “गाझा पट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात आणि तात्काळ मानवतावादी मदत तसेच जीवनरक्षक सेवा पोहोचवण्यासाठी एक ठोस आणि तत्वनिष्ठ मदत योजना आहे.”

उपासमार वाढत आहे

इस्रायलने पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासवर मदत चोरल्याचा आरोप केला आहे. मात्र हमासने हे आरोप एकीकडे नाकारले आहेत तर दुसरीकडे 2 मार्चपासून गाझाला सर्व मानवतावादी मदत पोहोचवण्यास अडथळा आणला आहे. हमासने उर्वरित सर्व ओलिसांना सोडावे अशी मागणी इस्रायलने केली आहे.

सोमवारी एका जागतिक उपासमारी निरीक्षण संस्थेने इशारा दिला की, ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायल आणि हमास युद्धात सापडलेल्या पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमधील लोकसंख्येच्या एक चतुर्थांश म्हणजे जवळपास पाच लाख लोक उपासमारीला तोंड देत आहेत.

ही चिंता काही प्रमाणात दूर व्हावी यासाठी गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशनने इस्रायलला ३० दिवसांच्या आत गाझाच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे तथाकथित मर्यादित संख्येने सुरक्षित मदत वितरण केंद्रे वाढविण्यास सांगितले आहे. त्यांनी इस्रायलला संयुक्त राष्ट्र आणि इतरांना मदत वितरण पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे जोपर्यंत ते स्थापित होत नाही.

“अशा काही विनंत्या केल्या आहेत याच्याशी मी फारसा परिचित नाही, कदाचित ते जेरुसलेममध्ये गेले तेव्हा याबद्दल चर्चा झाली असेल, परंतु मी तुम्हाला सांगेन की आम्ही अमेरिकेच्या प्रयत्नांचे कौतुक करतो,” इस्रायलचे UN राजदूत डॅनन यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले.

“आम्ही त्या प्रयत्नांना निधी देणार नाही. मात्र आम्ही त्यांना सुविधा देऊ. आम्ही त्यांना सक्षम करू,” असे ते म्हणाले. “आम्ही मदत देणारे नसू… ते काम अमेरिकेच्या नेतृत्वाखालील निधीद्वारे चालवले जाईल.”

इस्रायल आणि अमेरिकेने UN तसेच मदत गटांना फाउंडेशनला सहकार्य करण्याचे आणि त्यांच्यासोबत काम करण्याचे आवाहन केले आहे.

फाउंडेशनला निधी कसा दिला जाईल हे अद्याप स्पष्ट नाही. परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की अमेरिकन सरकारचा कोणताही निधी फाउंडेशनला जाणार नाही.

गेल्या आठवड्यात मदत समुदायात फिरणाऱ्या फाउंडेशनवरील एका पत्रकात, UN च्या जागतिक अन्न कार्यक्रमाचे माजी प्रमुख डेव्हिड बीस्ली यांचे नाव संभाव्य सल्लागार म्हणून सूचित केले गेले. मात्र, या घडामोडींशी परिचित असलेल्या एका सूत्राने सांगितले की बीस्ली सध्या सहभागी झालेले नाहीत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)


+ posts
Previous articleहोंडुरासचा नवी दिल्लीत दूतावास सुरू, भागीदारी वाढण्याची शक्यता
Next articleOperation Sindoor to Kabul Call: A Two-Front Message to Pakistan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here