Lahore पाठोपाठ पाकिस्तानच्या कराचीजवळ स्फोटाचे आवाज, तणावात वाढ

0

पाकिस्तानने Lahore पाठोपाठ, कराचीसह अन्य नऊ शहरांमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले. भारताच्या ‘Operation Sindoor’ नंतर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या आर्थिक राजधानीत असलेल्या शराफी गोठ परिसरात मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकायला आल्याची माहिती, स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, तिथून धातूचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत. स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. बचाव आणि सुरक्षा पथके घटनास्थळी तात्काळ पाठवण्यात आले असल्याचे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या घटनेपूर्वी, लाहोर शहरातही एक स्फोट झाल्याची नोंद आहे. लाहोर हे भारत-पाकिस्तान सीमेच्या जवळ स्थित शहर आहे.

स्फोटांची मालिका

स्थानिक माध्यमांनी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचा हवाला देत सांगितले की, “पाकिस्तानमधील नऊ शहरांमध्ये मोठ्या आवाजाचे स्फोट ऐकू आले.”

इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे (DG ISPR) महासंचालक- लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी सांगितले की, “या हल्ल्यांमध्ये लाहोर, रावळपिंडी, गुजरांवाला, चकवाल, अटक, बहावलपूर, मियांवाली, छोर आणि कराची या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.”

लष्कराने दावा केला आहे की, त्यांनी भारताचे काही ड्रोन निष्प्रभ केले मात्र, तहीही नऊ स्फोट नोंदवले गेले. या हल्ल्यांत पाकिस्तानच्या HQ-9 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीमला मोठे नुकसान झाल्याचे मानले जात आहे.

यावर DG ISPR अधिकारी म्हणाले की, “भारताने पुन्हा एकदा उघड उघड लष्करी आक्रमकतेचा अवलंब केला असून, विविध ठिकाणी HAROP ड्रोन पाठवले आहेत.”

अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पाकिस्तानच्या लष्कराने भारताचे 12 HAROP ड्रोन निष्प्रभ केले. हे ड्रोन लाहोर, गुजरांवाला, चकवाल, रावळपिंडी, अटक, बहावलपूर, मियांवाली, छोर आणि कराचीजवळ दिसून आले.

लाहोरजवळील एका लष्करी ठिकाणी एक ड्रोन स्फोट झाला, ज्यात पाकिस्तान लष्कराचे चार जवान जखमी झाले आणि काही उपकरणांचे आंशिक नुकसान झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

ISPR च्या माहितीनुसार, सिंधमधील मियानो भागात झालेल्या ड्रोन हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

विमानतळे बंद

संबंधित घडामोडींनंतर खबरदारी म्हणून कराची, लाहोर आणि सियालकोट येथील महत्त्वाचे विमानतळे तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.

लाहोर आणि सियालकोटमधील सर्व उड्डाणे गुरुवार सकाळी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत, ज्याचा परिणाम देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणांवर होणार आहे.

‘प्रवाशांनी त्यांच्या विमान कंपन्यांशी संपर्क साधून प्रवासाच्या वेळा आणि विलंबाबाबतची माहिती घ्यावी’, असे ANI ने सांगितले आहे.

या घडामोडी त्याच दिवशी घडल्या, जेव्हा भारतीय सैन्याने ‘Operation Sindoor‘ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हल्ले केले. हे हल्ले जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये गेल्या महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिशोधात करण्यात आले, ज्यामध्ये 26 लोक मृत्यूमुखी पडले होते, त्यातील बहुतांश हिंदू पर्यटक होते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleOperation Sindoor Enters Phase II: India Destroys Pakistani Air Defence, Foils Cross-Border Escalation Attempt
Next articleOperation Sindoor 2.0 – भारताने पाकिस्तानचा सीमापार कट हाणून पाडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here