
दरवर्षी सहा जुलै रोजी दलाई लामा यांच्या वाढदिवसाच्या उत्सवा निमित्ताने धरमशाला हे डोंगराळ शहर सजीव होते. यावेळी, मात्र वातावरणात एक विचित्र जडपणा आहे. जणू काही सर्वांनाच हे जाणवले आहे की 90 वर्षांचे परमपूज्य दलाई लामांचा सहवास कदाचित यानंतर फार वर्षांसाठी लाभणार नाही. त्यामुळे निर्वासित तिबेटच्या समुदायाला भविष्यातील अनिश्चिततेसाठी तयारी करावी लागणार आहे.
धुक्याच्या हवेत, दलाई लामांसाठी दीर्घायुष्य प्रार्थना टेकड्यांमधून प्रतिध्वनित होत असताना, रस्ते भाविकांनी, जगभरातील तिबेटी निरीक्षकांनी आणि अर्थातच सर्वव्यापी माध्यमांनी गर्दीने भरलेले असतात.
“आम्हाला वाटते की या वर्षी ते निवृत्त होतील”, असे कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी एका गटासह प्रवास करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. पण दलाई लामा निवृत्त होतात का? भूतकाळात असे कधी घडले आहे का? सध्याच्या दलाई लामा यांनी 2011 मध्ये त्यांच्या राजकीय भूमिकेपासून फारकत घेतली, ज्यामुळे निर्वासित तिबेटी समुदायाद्वारे निवडल्या जाणाऱ्या संस्थांचा मार्ग मोकळा झाला.
परंतु आध्यात्मिक कर्तव्यांपासून ते निवृत्ती घेऊन शकत नाहीत कारण दलाई लामा हे करुणेचे बोधिसत्व असलेल्या अवलोकितेश्वराचा पुनर्जन्म आहेत असे मानले जाते. काही दिवसांपूर्वी दलाई लामा यांनी असे सूचित केले आहे की त्यांचा उत्तराधिकारी पुनर्जन्माद्वारेच येईल, त्यामुळे भविष्य निश्चित झाले आहे. सामान्यतः दलाई लामांच्या मृत्यूनंतर असे होते.
या मंदिरांच्या शहराच्या रस्त्यांवर एक श्रद्धा वास करून आहे. भूतानमधील एक महिला यात्रेकरू तिच्या श्रद्धेला चिकटून आहे, तिची अशी खात्री आहे की दलाई लामा संपूर्ण बौद्ध परंपरेला एकत्र आणतात आणि बुद्धाच्या आत्म्याला मूर्त रूप देतात, त्यामुळे भविष्य सुनिश्चित होते.
तिच्याबरोबरचे मूल हे तिचे भविष्य आहेः तो दलाई लामांना प्रत्यक्ष भेटेल आणि आशा आहे की ती भेट त्याच्या हृदयात कायमस्वरूपी जपून ठेवली जाईल.
इस्रायलमधून महिलांचा एक गट आला आहे. दलाई लामा यांचा वाढदिवस म्हणजे जणूकाही या महिलांसाठी एक अध्यात्मिक विधी आहे, जो त्या चुकवत नाहीत.
दलाई लामा यांच्या दीर्घायुष्यावरील त्यांच्या विश्वासावर आधारित, शांत आशावादाने फिरणाऱ्या मरून रंगाचा झगा घातलेल्या भिक्षूंना चुकवू नका. त्यांच्यासाठी, तो त्यांचा अतूट मार्गदर्शक प्रकाश आहे आणि काहीही त्यांचा प्रभाव मंद करू शकत नाही.
पण हो त्यांचा हा 90 वा वाढदिवस खास आहे हे सर्वजण मान्य करतात. त्यांचे पावित्र्य काय आहे हे सांगण्याची गरजच नाही. मात्र त्यांच्यामुळे भविष्याबद्दलच्या कोणत्याही शंका आणि अनिश्चितता दूर होऊ शकतात. आशा आहे की 6 जुलै रोजी त्या सर्व शंकांचे निरसन होईल.
अनुकृती