भारत, पोलंड, हंगेरीचे अंतराळवीर ऐतिहासिक मोहिमेत सामील

0

 

नासामधून निवृत्त झालेली पण आता खासगी अंतराळवीर असलेल्या पेगी व्हिटसन हिने बुधवारी पहाटे तिच्या कारकीर्दीतील पाचव्या अंतराळ उड्डाण मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेत तिच्यासोबत भारत, पोलंड आणि हंगेरीमधील क्रूमेट त्यांच्या देशांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या पहिल्या भेटीसाठी रवाना झाले.

एलोन मस्क यांच्या रॉकेट उपक्रम स्पेसएक्सच्या भागीदारीत टेक्सास स्थित स्टार्टअप एक्सिओम स्पेसने आयोजित केलेल्या नवीनतम मोहिमेची सुरुवात करत, अंतराळवीरांच्या चमूने फ्लोरिडाच्या केप कॅनावेरल येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून पहाटे 2.30 वाजता (0630 जीएमटी) उड्डाण केले.

दोन टप्प्यांच्या फाल्कन 9 रॉकेटवर असलेल्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलचा समावेश असलेल्या स्पेसएक्सच्या उंच प्रक्षेपण वाहनावरून चार सदस्यांच्या क्रूला वर नेण्यात आले.

लाइव्ह व्हिडिओमध्ये उंच अंतराळ यान फ्लोरिडाच्या अटलांटिक किनाऱ्यावर रात्रीच्या आकाशात झेपावताना दिसले, ज्याच्या मागोमाग आगीच्या उत्सर्जनाची चमकदार पिवळ्या रंगाची शेपूट होती.

‘अविश्वसनीय चढाई’

क्रू कंपार्टमेंटमधील कॅमेऱ्यांमध्ये चार अंतराळवीर त्यांच्या प्रेशराइज्ड केबिनमध्ये अडकलेले, हेल्मेट घातलेल्या पांढऱ्या आणि काळ्या फ्लाइट सूटमध्ये शेजारी शेजारी शांतपणे बसलेले, त्यांचे अंतराळयान आकाशात झेप घेत असतानाचे फुटेज प्रसारित होत होते.

“आमचा चढाईनंतरचा एक अविश्वसनीय प्रवास सुरू झाला आहे,” असे व्हिट्सनने लॉस एंजेलिसजवळील स्पेसएक्स मिशन कंट्रोलला रेडिओवरून सांगितले तेव्हा फाल्कनच्या वरच्या टप्प्याने प्रक्षेपणानंतर सुमारे नऊ मिनिटांनी क्रू कॅप्सूल त्याच्या प्राथमिक कक्षेत पोहोचवले.

अ‍ॅक्सिओम क्रूने “ग्रेस” असे नाव दिलेले, बुधवारी लाँच केलेले नव्याने बांधलेले क्रू ड्रॅगन हे स्पेसएक्स कॅप्सूल ताफ्यातील पाचवे वाहन म्हणून पदार्पण करत होते.

या महिन्याच्या सुरुवातीला एका हाय-प्रोफाइल राजकीय वादात ट्रम्प यांनी मस्क यांचे सर्व सरकारी करार रद्द करण्याची धमकी दिल्यानंतर मस्क यांनी काही काळ यान बंद करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर क्रू ड्रॅगनचे हे हिलेच उड्डाण होते.

दोन आठवडे कक्षेत

अ‍ॅक्सिओम 4 चा स्वायत्तपणे चालवला जाणारा क्रू ड्रॅगन सुमारे 28 तासांच्या उड्डाणानंतर आयएसएसवर (International Space Station) पोहोचेल अशी अपेक्षा असून, त्यानंतर दोन्ही वाहने पृथ्वीपासून सुमारे 250 मैलावर (400 किमी)  कक्षेत एकत्र येतील तेव्हा ते आऊटपोस्टशी जोडले जाईल.

जर सर्व काही योजनेनुसार पार पडले, तर अ‍ॅक्सिओम 4 च्या क्रूचे गुरुवारी सकाळी कक्षेत असलेल्या अंतराळ प्रयोगशाळेत स्वागत तिथे सध्या राहत असलेल्या सात अंतराळवीरांकडून केले जाईल. या सातमध्ये अमेरिकेचे तीन अंतराळवीर, जपानचा एक आणि रशियाचे तीन अंतराळवीर आहेत.

65 वर्षीय व्हिट्सन आणि तिचे अ‍ॅक्सिओम 4 मधील तीन क्रूमेट्स – भारताचे 39 वर्षीय शुभांशू शुक्ला, पोलंडचे 41 वर्षांचे स्लावोस उझ्नान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे 33 वर्षांचे टिबोर कापू, सूक्ष्म गुरुत्वाकर्षण संशोधन करण्यासाठी अंतराळ स्थानकात 14 दिवस घालवणार आहेत.

2022 नंतर अ‍ॅक्सिओमने आयोजित केलेले हे चौथे उड्डाण आहे. ह्युस्टन येथे मुख्यालय असलेली ही कंपनी इतर  खाजगी कंपन्या आणि परदेशी सरकारांनी प्रायोजित केलेल्या अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्याच्या व्यवसायावर काम करत आहे.

ऐतिहासिक अंतराळ पुनरागमन

भारत, पोलंड आणि हंगेरी या देशांनी, या प्रक्षेपणाद्वारे 40 वर्षांहून अधिक काळानंतर मानवी अंतराळ उड्डाणात पुनरागमन केले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर या देशांचे अंतराळवीर पाठविणारे हे पहिलेच अभियान आहे.

भारतीय हवाई दलाचे पायलट असणारे शुक्ला यांच्या अ‍ॅक्सिओम 4 मधील सहभागाकडे भारताच्या स्वतःच्या अंतराळ कार्यक्रमात 2027 मध्ये नियोजित गगनयान कक्षीय अंतराळयानाच्या पहिल्या क्रू मोहिमेची एक प्रकारची पूर्वतयारी म्हणून पाहिले जाते.

अ‍ॅक्सिओम 4 मधील क्रूचे नेतृत्व व्हिटसन करत आहेत, ज्या 2018 मध्ये नासातून निवृत्त झाल्या असून अमेरिकेच्या अंतराळ संस्थेच्या पहिल्या महिला मुख्य अंतराळवीर आणि आयएसएस मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आहे.

अ‍ॅक्सिओमसाठी आता मानवी अंतराळ उड्डाणाच्या सल्लागार आणि संचालक म्हणून, तिने तीन नासा मोहिमांमध्ये आणि 2023 मध्ये अ‍ॅक्सिओम 2 मोहिमेच्या कमांडर म्हणून चौथ्या अंतराळ उड्डाणादरम्यान 675 दिवस अंतराळात घालवले आहेत, जो एक अमेरिकन विक्रम आहे.

मस्क यांच्या खाजगी निधीतून बांधण्यात आलेल्या या रॉकेट कंपनीने पाच वर्षांपूर्वी नासासाठी एका नवीन युगाची सुरुवात केली.  बुधवारी झालेल्या स्पेसएक्सच्या 18 व्या मानवी अंतराळ उड्डाणामुळे, 2011 मधील स्पेस शटल युगाच्या समाप्तीनंतर अमेरिकन अंतराळवीरांना अमेरिकेच्या भूमीवरून अवकाशात जाण्याची संधी मिळाली.

नासाच्या माजी आयएसएस प्रोग्राम मॅनेजरने सह-स्थापना केलेला नऊ वर्षांचा जुना उपक्रम, अ‍ॅक्सिओम, ही काही मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे जी आयएसएसची जागा घेण्यासाठी स्वतःचे व्यावसायिक अंतराळ स्थानक विकसित करत आहे, जे 2030 च्या सुमारास निवृत्त होईल असा नासाचा अ आहे.

केप कॅनावेरल येथील प्रक्षेपण स्थळ सुसज्ज करण्याव्यतिरिक्त, कक्षीय आऊटपोस्टशी जोडले गेल्यानंतर अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात घेऊन जाण्याची जबाबदारी नासाने स्वीकारली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 


+ posts
Previous articleब्रिटनचे F-35B विमानः तांत्रिक बिघाडामुळे अजूनही केरळमध्येच
Next articleशशी थरूर यांनी मॉस्कोमध्ये अस्खलित फ्रेंच बोलत, पाकिस्तानला फटकारले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here