लष्करी देखरेखीसाठी Stratospheric विमानाची उड्डाण चाचणी

0

भारताने शनिवारी स्वदेशी Stratospheric (समतापमंडलीय) विमान प्लॅटफॉर्मची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. या चाचणीमुळे देशाची पाळत आणि गुप्तचर क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं गेलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) मध्य प्रदेशातील श्योपूर येथील चाचणी स्थळावर ही उड्डाण चाचणी घेतली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की केवळ मोजक्या देशांनी इतके उंच, हवेपेक्षा हलके प्लॅटफॉर्म विकसित केले आहेत, जे या यशाचे गुंतागुंतीचे आणि धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करते.

DRDO चे अध्यक्ष समीर व्ही. कामत यांनी यशस्वी प्रोटोटाइप उड्डाण हे  Stratospheric उंचीवर विस्तारित कालावधीसाठी हवेमध्ये राहण्यास सक्षम असलेल्या उच्च-उंचीच्या प्लॅटफॉर्म सिस्टमच्या (HAPS) विकासातील एक ‘मैलाचा दगड’ असल्याचे वर्णन केले.

संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, उपकरणांचे पेलोड घेऊन सुमारे 17 किमी उंचीवर हे विमान प्रक्षेपित करण्यात आले. उड्डाणादरम्यान गोळा केलेली माहिती भविष्यातील मोहिमांसाठी high-fidelity simulation मॉडेल विकसित करण्यात मदत करेल.

ही प्रणाली भारताच्या पृथ्वी निरीक्षण आणि ISR (Intelligence, Surveillance and Reconnaissance)  क्षमतांमध्ये अद्वितीय वाढ करेल असे सांगून, अशा स्वदेशी तंत्रज्ञानासह देशाला मोजक्या राष्ट्रांमध्ये स्थान देईल, असे सांगून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीबद्दल DRDO चे अभिनंदन केले.

आग्रा येथील DRDO च्या Aerial Delivery Research and Development Establishment ने (ADRDE) विकसित केलेले हे विमान ऑनबोर्ड सेन्सर्स आणि कामगिरी-देखरेख प्रणालींनी सुसज्ज होते. 62 मिनिटांच्या उड्डाणादरम्यान envelope pressure control and emergency deflation यासारख्या गंभीर प्रणालींची देखील चाचणी घेण्यात आली.

“पुढील विश्लेषणासाठी ही प्रणाली यशस्वीरित्या पुनर्प्राप्त करण्यात आली,” असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले आहेत, वाढत्या सुरक्षेच्या काळात हा यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleIndia Conducts Flight Trial of Stratospheric Airship for Military Surveillance
Next articleचार दिवस पुरेल इतक्याच दारूगोळ्यामुळे पाकिस्तानची युद्धसज्जता धोक्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here