HADR सरावाचा भाग म्हणून, भारताची INS Sharda मालदीवमध्ये दाखल

0

भारताच्या प्रादेशिक सहकार्याच्या वचनबद्धतेनुसार, INS Sharda ही युद्धनौका, 4 मे ते 10 मे दरम्यान नियोजित ‘मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण’ (HADR- Humanitarian Assistance and Disaster Relief) सरावासाठी, मालदीवच्या माफिलाफुशी अ‍ॅटॉल येथे दाखल झाली आहे.

INS Sharda जहाजाची ही तैनाती, भारत आणि मालदीव यांच्यातील दृढ संरक्षण आणि सागरी सहकार्याचे प्रतीक आहे,” असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

मंत्रालयाने सांगितले की, “ही तैनाती भारताच्या “MAHASAGAR” – प्रादेशिक सुरक्षेसाठी परस्पर आणि सर्वंकष प्रगती, या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे, ज्यामध्ये हिंद महासागर क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्नांवर भर देण्यात आला आहे.

HADR सराव

मालदीवचमध्ये आयोजित या HADR सरावाचा मुख्य उद्देश, भारतीय नौदल आणि मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल (MNDF) यांच्यातील समन्वय क्षमता वाढवणे हा आहे.

“या सरावात – आपत्ती प्रतिसाद समन्वय, शोध प्रक्रिया, बचाव मोहिमा, वैद्यकीय मदत तसेच रसद पाठबळ, संयुक्त सराव, प्रशिक्षण सत्रे आणि मोठ्या नैसर्गिक आपत्तीनंतर स्थानिक समुदायांसोबत सहभाग यावर भर दिला जाईल,” असे निवेदनात म्हटले आहे.

अशा सामूहिक प्रयत्नांद्वारे, भारत आणि मालदीव आपले भागीदारी संबंध बळकट करत आहेत आणि नैसर्गिक आपत्ती व अन्य मानवी आपत्कालीन परिस्थितींसाठी तयार राहण्याचे उद्दिष्ट साधत आहेत.

भारत-मालदीव संबंध

भारत आणि मालदीव यांच्यात प्राचीन काळापासून धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक, आणि व्यापारी संबंध आहेत.

1965 मध्ये, स्वातंत्र्यानंतर मालदीवला मान्यता देणाऱ्या पहिल्या काही देशांपैकी एक भारत होता आणि दोन्ही देशांमध्ये राजकीय संबंध प्रस्थापित करण्यातही भारताने पुढाकार घेतला होता.

मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाच्या (MNDF) सुमारे 70% प्रशिक्षणात्मक गरजा भारत पूर्ण करत असून, गेल्या 10 वर्षांत भारताने १५०० हून अधिक MNDF प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

“MNDF अधिकाऱ्यांना भारतातील NDA, IMA, OTA, INA, AFMC, DSSC, NDC यांसारख्या विविध संरक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे,” असे मालदीवमधील भारतीय दूतावासाच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे.

MNDF ने, भारतीय सशस्त्र दलांसोबत – संयुक्त EEZ गस्त, संयुक्त सराव, अंमली पदार्थविरोधी मोहिमा, शोध व बचाव, सी-रायडर कार्यक्रम, HADR सराव, सेलिंग रेजाटा अशा विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.

भारतीय नौदलाने देखील MNDF ला हवाई गस्त, वैद्यकीय आपत्कालीन स्थलांतरण (MEDEVAC), शोध व बचाव मोहिमा आणि हेलो-बोर्न क्षमता यासाठी हवाई साधनं पुरवली आहेत.

2019 पासून, सुमारे 630 MEDEVAC, SAR मोहिमा आणि वैद्यकीय पथकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

भारताची मालदीवच्या आरोग्य व्यवस्थेस मदत

वैद्यकीय उपकरणे पुरवण्यासोबतच, वैद्यकीय तज्ज्ञांचे एक पथक मालेतील MNDF च्या सेनाहिया रुग्णालयात कार्यरत असून MNDF डॉक्टरांशी तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण करत आहे. बरेच MNDF डॉक्टर AFMC, पुणे येथे प्रशिक्षण घेत आहेत किंवा घेत आहेत.

भारत-मालदीव संरक्षण सहकार्यामध्ये संयुक्त सराव, सागरी क्षेत्र जागरूकता, उपकरण भेट देणे, पृष्ठभागी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधा विकास इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे.

संरक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये MNDF साठी कॉम्पोजिट ट्रेनिंग सेंटर (CTC), कोस्टल रडार सिस्टीम (CRS), नवीन संरक्षण मंत्रालय मुख्यालयाची निर्मिती आणि “एकता” MNDF बंदराचे बांधकाम यांचा समावेश आहे.

MNDF चे संरक्षणप्रमुख मेजर जनरल इब्राहीम हिलमी, यांनी सप्टेंबर 2024 मध्ये भारताचा अधिकृत दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी भारताच्या संरक्षण सचिवांसोबत 5व्या संरक्षण सहकार्य संवादाचे (DCD) सह-अध्यक्षस्थानही भूषवले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articlePerfect is Almost Always the Enemy of Good Enough: Even for Nuclear Powered Attack Submarines
Next articleआर्थिक, राजकीय गोंधळात जर्मनीत फ्रेडरिक मर्झ चान्सलर होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here