Iran: अब्बास बंदरातील स्फोटात 40 जणांचा मृत्यू, 1,200 हून अधिक जखमी

0

इराणच्या राज्य माध्यमांनी रविवारी दिलेल्या वृत्तानुसार, देशातील सर्वात मोठ्या अब्बास बंदामध्ये झालेल्या भीषण स्फोटात, किमान 40 जणांचा मृत्यू झाला असून, 1,200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दल अजूनही आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

‘शनिवारी ‘शहीद राजाी’ विभागात झालेल्या या स्फोटामुळे, जो Iran मधील सर्वात मोठा कंटेनर हब आहे, अनेक किलोमीटरपर्यंतच्या परिसरातील खिडक्यांचे नुकसान झाले, शिपिंग कंटेनर्सवरील धातूचे पट्टे फाटले आणि सामग्रीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले,’ असे राज्य माध्यमांनी सांगितले.

ही दुर्घटना, ओमानमध्ये इराणची अमेरिकेसोबत तिसऱ्या फेरीतील अणु चर्चा सुरू असताना घडली आहे.

रविवारी रात्रीपर्यंत बंदरातील विविध भागांत आग पुन्हा पुन्हा भडकत होती, जी विझवण्यासाठी अग्निशमन दलाची हेलिकॉप्टर्स पूर्ण प्रयत्न करत होते.

“शत्रूच्या कटु मानसिकतेशी जुळता अहवाल”

बंदरात असलेल्या रसायनांच्या प्रचंड साठ्यामुळे, ही भीषण आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे, परंतु नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. क्षेपणास्त्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉलिड फ्युएलच्या चुकीच्या हाताळणीशी स्फोटाचा संबंध असल्याच्या आंतरराष्ट्रीय अहवालांना, इराणच्या संरक्षण मंत्रालयाने फेटाळले आहे.

मंत्रालयाच्या प्रवक्त्याने राज्यवाहिनीवर सांगितले की, “सादर करण्यात आलेले अहवाल ‘शत्रूच्या कटु मानसिकतेशी’ जुळते आहेत, स्फोटग्रस्त भागात त्यावेळी कोणतीही लष्करी सामग्री नव्हती.”

Associated Press नुसार, ब्रिटिश सुरक्षा कंपनी Ambrey ने सांगितले की, ‘मार्चमध्ये बंदरावर सोडियम पर्च्लोरेट या क्षेपणास्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनाचा साठा पोहोचला होता आणि त्याची चुकीची हाताळणी हे स्फोटाचे संभाव्य कारण ठरू शकते.’

Financial Times या वृत्तपत्राने जानेवारीमध्ये नोंदवले होते की, ‘इराणच्या दोन जहाजांनी चीनमधून पुरवलेले रसायन 260 मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांकरता पुरेसे होते, ज्यामुळे इराणने 2024 मध्ये इस्रायलवर थेट क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर आपला साठा भरून काढला होता.’

प्राणघातक अपघात

रविवारी स्फोट झालेल्या ठिकाणाहून काळ्या धुराचे लोट उठत होते आणि वाकलेल्या धातूचे तुकडे आणि मातीचे ढिगारे संपूर्ण परिसरात विखुरलेले होते.

इराणच्या रेड क्रिसेंट सोसायटीच्या प्रमुखांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार, “दुपारपर्यंत आग 90% आटोक्यात आली आहे आणि शहीद राजीच्या स्फोटापासून बचावलेल्या भागांमधील बंदराचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.”

देशाच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या प्रवक्त्याने शनिवारी सांगितले की, “शहीद राजीमध्ये केले गेलेली रसायनांची अयोग्य साठवण, हे स्फोटाचे संभाव्य कारण आहे आणि यापूर्वीच याविषयीच्या धोक्यांबाबत इशारे दिले गेले होते.”

“पूर्वग्रहदूषित अंदाज टाळावेत”

सरकारी प्रवक्त्या फातेमा मोहेजरानी यांनी, “पूर्वग्रहदूषित अंदाज” न करण्याचे आवाहन केले आणि सांगितले की, ‘तपास पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निष्कर्ष जाहीर केला जाईल.’

इराणमध्ये गेल्या काही वर्षांतील ऊर्जा व औद्योगिक पायाभूत सुविधांवरील अनेक प्राणघातक दुर्घटनांमध्ये, निष्काळजीपणालाच कारणीभूत ठरवले गेले आहे.

“आपण हे कंटेनर इथे 3-4 महिने का ठेवले होते?, जेव्हा हे ठिकाण आधीपासूनच जवळपास 1 लाख 40 हजार कंटेनर्सनी भरलं गेले होते,” असे इराणचे अध्यक्ष मासूद पेझेश्कियन यांनी रविवारी बंदर अब्बासला भेट दिल्यावर म्हटले.

इराणमध्ये आधीसुद्धा, शुद्धीकरण प्रकल्पाला लागलेली आगी, कोळसा खाणीत झालेला स्फोट आणि 2023 मध्ये बंदर अब्बासमध्ये एका कामगाराचा झालेला अपघाती मृत्यू, अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत.

इराणने अन्य काही घटनांसाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे, कारण इस्रायलने इराणच्या अणु कार्यक्रमाला लक्ष्य करत इराणच्या भूभागावर अनेकदा हल्ले केले आहेत आणि गेल्यावर्षी तेथील हवाई संरक्षण यंत्रणांवर बॉम्बहल्ला देखील करण्यात आला होता.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुटसह)


Spread the love
Previous articleभारताची IOS SAGAR मॉरिशसमध्ये दाखल, सागरी संबंधांचे मजबूतीकरण
Next articleजागतिक अनिश्चिततेमध्ये जपान – व्हिएतनाम व्यापारी संबंध दृढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here