कल्याणी ग्रुपने ‘मेड इन इंडिया’ तोफखाना प्रणालीसह इंडोनेशियाचे लक्ष वेधले

0

इंडोनेशियातील जकार्ता येथे 11 ते 14 जून दरम्यान झालेल्या, ‘Indo Defence Expo & Forum 2025’ मध्ये, भारताने आपली दमदार उपस्थिती नोंदवली आहे.

आग्नेय आशियातील या सर्वात मोठ्या संरक्षण प्रदर्शनात, भारतातील भारत फोर्ज लिमिटेडची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी, कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (KSSL) ग्रुपने, Garuda 105 आणि MArG 45, या दोन अत्याधुनिक ‘मेड इन इंडिया’ मोबाइल तोफखाना प्रणाली सादर केल्या.

या दोन प्रणालींपैकी एक म्हणजे- Garuda 105 मिमी/37 कॅलिबर माउंटेड गन सिस्टम (MGS). ही प्रणाली कोणत्याही प्रकारच्या भूप्रदेशात सहज नेण्या-आणण्यायोग्. असून, ‘शूट अँड स्कूट’ क्षमता असलेली आहे. अशा प्रकारची प्रणाली इंडोनेशियाच्या लष्करासाठी तसेच आग्नेय आशियातील इतर देशांच्या लष्करांसाठी उपयुक्त ठरू शकते, जिथे अनेक वेळा मजबूत रस्ते जाळे उपलब्ध नसते. गरुडा सिस्टीम केवळ 5.5 टन वजनाची असून ती एका बेटावरून दुसऱ्या बेटावर सहजपणे हवाईमार्गे हलवता येऊ शकते. ही तोफ अवघ्या दीड मिनिटांत कार्यक्षम स्थितीत आणता येते. विशेष म्हणजे, ‘गरुडा’ हे इंडोनेशियाचे राष्ट्रीय प्रतीक आहे, जसे की भारतासाठी अशोकस्तंभ किंवा सारनाथचे सिंहस्तंभ.

KSSL ने MArG 45 मालिका देखील सादर केली आहे, ज्यामध्ये 155 मिमी माउंटेड गन सिस्टम्स, 39 आणि 45 कॅलिबर प्रकारात उपलब्ध आहेत. ही अत्यंत प्रभावी तोफ प्रणाली 18 टन वजनाची असून, ती 30 अंश उतार असलेल्या भागात सहज हालचाल करू शकते. तिचे वजन असूनही ती इंडोनेशियन हवाई दलाच्या विद्यमान टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट ताफ्याद्वारे सहजपणे हलवता येऊ शकते. ही तोफदेखील स्थिर झाल्यानंतर केवळ दीड मिनिटांत गोळीबारासाठी सज्ज होते.

KSSL ची ही उपस्थिती भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संरक्षण उद्योग सहकार्याला चालना देणारी महत्त्वाची पायरी मानली जात आहे. ‘Indo Defence Expo 2025 & Forum‘ हे आग्नेय आशियातील सर्वात मोठे संरक्षण प्रदर्शन असून येथे औद्योगिक जाळे निर्माण करणे आणि संरक्षण निर्यातीच्या संधी शोधणे यावर भर दिला जातो, ज्यामुळे भारत-इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होते.

KSSL ची Indo Defence Expo 2025 मधील प्रभावी उपस्थिती, केवळ त्यांच्या तांत्रिक क्षमतेचे दर्शन घडवत नाही, तर जागतिक बाजारात स्वदेशी संरक्षण उपाययोजना प्रोत्साहित करण्यासाठी भारताच्या व्यापक दृष्टिकोनाचेही प्रतीक ठरते.

by-Dhruv Yadav


+ posts
Previous articleSCO Defence Meet: गलवान संघर्षानंतर राजनाथ सिंह यांचा पहिला चीन दौरा
Next articleपाकिस्तानचे सर्व दावे फेटाळत, राफेलचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here