MI6 चे सध्याचे प्रमुख रिचर्ड मूर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ समाप्त होत असून ते शरद ऋतूमध्ये पायउतार होतील.
‘अभिमान आणि सन्मान’
“मला माझ्या सेवेचे नेतृत्व करण्यास सांगितले गेल्याचा मला अभिमान असून एकप्रकारे तो सन्मानदेखील आहे,” असे मेट्रोवेली म्हणाल्या. पाश्चात्य गुप्तचर क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली पदांपैकी हे एक पद असून यानंतर त्या “सी” या सांकेतिक नावाने ओळखल्या जातील.
1909 मध्ये स्थापन झालेल्या MI6 मध्ये झालेल्या या नियुक्तीमुळे इतर प्रमुख ब्रिटिश गुप्तचर संस्था, देशांतर्गत गुप्तचर सेवा MI5 आणि गुप्तचर संप्रेषण संस्था GCHQ च्या पंक्तीत ही संस्था आली आहे.
अभूतपूर्व धोके
G7 शिखर परिषदेसाठी सध्या कॅनडामध्ये असलेले पंतप्रधान केयर स्टारमर म्हणाले की, मेट्रोवेली यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा ब्रिटनला “अभूतपूर्व प्रमाणात धोक्यांचा सामना करावा लागत आहे.”
“मला विश्वास आहे की ब्लेझ आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले उत्कृष्ट नेतृत्व देत राहतील,” असे ते म्हणाले.
मेट्रोवेलीची सर्वात मोठी आव्हाने म्हणजे रशिया, चीन आणि इराण यांच्याशी सामना करणे.
ब्रिटनच्या गुप्तचर संस्थांनी रशियावर आरोप केला आहे की रशियाने युक्रेन आक्रमणाविरुद्धच्या लढाईत युक्रेनला पाठिंबा देऊ नये यासाठी इतर देशांना धमकावून संपूर्ण युरोपमध्ये तोडफोड मोहीम राबवली आहे.
2021 मध्ये मूर म्हणाले होते की चीन त्यांच्या गुप्तचर संघटनेसाठीची सर्वात मोठी प्राथमिकता आहे, तर MI5 ने गेल्या वर्षी म्हटले होते की 2022 पासून ब्रिटनमधील असंतुष्टांना किंवा राजकीय विरोधकांना मारण्यासाठी, अपहरण करण्यासाठी किंवा लक्ष्य करण्यासाठी आखण्यात आलेल्या 20 कटांमागे इराणचा सहभाग आहे.
जेम्स बाँड कनेक्शन
जॉन ले कॅरेच्या जॉर्ज स्मायलीपासून ते इयान फ्लेमिंगच्या जेम्स बॉण्डपर्यंतच्या काही सर्वात संस्मरणीय काल्पनिक हेरांचा पुढारी म्हणून कादंबरीकारांनी चित्रित केलेला जेम्स बॉण्ड MI6 चा हेर म्हणून परदेशात कार्यरत आहे. ब्रिटन आणि त्याच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचे काम त्याच्यावर सोपवण्यात आले आहे.
मेट्रेवेली यांनी यापूर्वी MI5 मध्ये संचालक-स्तरीय भूमिका बजावली होती आणि केंब्रिज विद्यापीठात मानववंशशास्त्र अभ्यासक्रमाच्या त्या पदवीधर आहेत, असे सरकारने म्हटले आहे.
MI5 मध्ये दोन महिला प्रमुख आहेत, ज्यांची सुरुवात 1992 मध्ये स्टेला रिमिंग्टन यांनी केली होती. एलिझा मॅनिंगहॅम-बुलर यांनी 2002 ते 2007 दरम्यान MI5 चे नेतृत्व केले होते.
2023 मध्ये, ब्रिटनने GCHQ च्या पहिल्या महिला संचालकांची नियुक्ती केली.
जेम्स बाँड चित्रपट “गोल्डन आय” मध्ये अभिनेत्री जूडी डेंचने पहिल्यांदा MI6 च्या महिला बॉसची भूमिका साकारल्यानंतर तीन दशकांनंतर मेट्रेवेली यांची नियुक्ती झाली आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)