L&TAdani DefenceSolar GroupGeneral Atomics MQ-9B SkyGuardian – Whatever the Mission, MQ-9B Delivers
Saturday, October 31, 2026
Solar
General Atomics MQ-9B SkyGuardian – Whatever the Mission, MQ-9B Delivers
Home Bharat Shakti Marathi एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी CICS पदाचा कार्यभार स्वीकारला

एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी CICS पदाचा कार्यभार स्वीकारला

0

20 हून जास्त प्रकारच्या विमानांच्या 3 हजार 300 तासांहून अधिक उड्डाणांचा अनुभव असणाऱ्या एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी 01 मे 2025 रोजी नवी दिल्ली इथल्या एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालयात एकात्मिक संरक्षण कर्मचारी प्रमुख (CICS) पदाचा कार्यभार स्वीकारला. 30 एप्रिल 2025 रोजी लेफ्टनंट जनरल जे.पी. मॅथ्यू या पदावरुन सेवानिवृत्त झाल्यामुळे आशुतोष दीक्षित यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.

सीआयएससी म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी, एअर मार्शल आशुतोष दीक्षित मध्य हवाई दलाच्या प्रमुखपदी कार्यरत होते. त्यांनी उत्तर भारत आणि मध्य क्षेत्रात मोहिमेअंतर्गत तत्परता वाढवण्यावर आणि इतर सेवांशी समन्वय साधण्यावर लक्ष केंद्रित केले.

एअर मार्शल आशुतोष दीक्षित 06 डिसेंबर 1986 रोजी भारतीय वायुसेनेच्या लढाऊ पथकात नियुक्त झाल्यानंतर गेल्या चार दशकांच्या प्रदीर्घ आणि वैशिष्ट्यपूर्ण कारकीर्दीत एअर मार्शल दीक्षित यांनी अनेक कमांड, कर्मचारी आणि प्रशिक्षक पदांच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, त्यांच्या सेवेसाठी त्यांना अतिविशिष्ट सेवापदक, विशिष्ट सेवापदक आणि वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

ते खडकवासला इथली राष्ट्रीय संरक्षण अकादमी; बांगलादेशातले संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय यांचे माजी विद्यार्थी आहेत. ते प्रशिक्षित उड्डाण प्रशिक्षक आणि प्रायोगिक चाचणी वैमानिक असून, त्यांना मिराज-2000, मिग-21 आणि जग्वार ही विमाने उडवण्याचा अनुभव आहे.

एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी दक्षिण क्षेत्रातील एका प्रमुख लढाऊ  प्रशिक्षण तळाचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली  तो तळ कमांडमधील सर्वोत्कृष्ट तळ ठरला. बंगळुरू येथील एअरक्राफ्ट अँड सिस्टीम्स टेस्टिंग इस्टॅब्लिशमेंटमधील फ्लाइट टेस्ट स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून, त्यांनी स्वदेशी विमान सुधारणा आणि विकास कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले, ज्यात जॅग्वार आणि मिग-27 साठी एव्हिओनिक्स वाढीचा समावेश आहे.

एअर स्टाफ रिक्वायरमेंट्सचे संचालक म्हणून, त्यांनी मध्यम बहु-भूमिका लढाऊ विमान (MMRCA) चाचण्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

टीम भारतशक्ती

 

+ posts
Previous article‘भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास बांगलादेशने ईशान्य राज्यांवर कब्जा करावा’
Next articleIsrael Strikes Near Syrian Presidential Palace