एअर मार्शल तिवारी यांनी स्वीकारला हवाई कर्मचारी उपप्रमुखपदाचा कार्यभार

0
हवाई

एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी  यांनी 02 मे 25 रोजी आयएएफच्या हवाई कर्मचारी उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. एअर मार्शल एस. पी. धारकर 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे एअर मार्शल तिवारी यांची या पदासाठी निवड झाली होती.

हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी गांधीनगर येथे मुख्यालय असलेल्या दक्षिण पश्चिम हवाई कमांडमध्ये एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते. त्यांनी मे 2023 मध्ये पदभार स्वीकारला होता.

हवाई मुख्यालयात (वायु भवन) आगमन झाल्यानंतर एअर मार्शल तिवारी यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.


एअर मार्शल यांनी त्यांचे शालेय शिक्षण देहरादून येथील राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय (आर आय एम सी) येथे पूर्ण केले, खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे ते माजी विद्यार्थी आहेत. जून 1985 मध्ये ते राष्ट्रपती सुवर्णपदकासह अकादमीमधून उत्तीर्ण झाले.

एअर मार्शल तिवारी हे एक अत्यंत कुशल विमानचालक, एक पात्र उड्डाण प्रशिक्षक आणि प्रायोगिक चाचणी पायलट आहेत. एअर मार्शल हे अमेरिकेतील एअर कमांड अँड स्टाफ कॉलेजचे पदवीधर आहेत त्यांनी विविध प्रकारची विमाने उडवली आहेत आणि त्यांना विशेषतः मिराज-2000 प्लॅटफॉर्मवर काम करण्याचा व्यापक अनुभव आहे. त्यांच्या कारकिर्दीत विविध शस्त्रे आणि प्रणालींचे मूल्यांकन आणि कार्यान्वित चाचणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान समाविष्ट आहे.

कारगिल संघर्षादरम्यान, अनुकरणीय कौशल्य आणि नेतृत्व दाखवून त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या विशिष्ट सेवेची दखल घेऊन एअर मार्शल यांना 2025 मध्ये परम विशिष्ट सेवा पदक, 2022 मध्ये अति विशिष्ट सेवा पदक आणि 2008 मध्ये वायू  सेना पदक या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleपाकिस्तानला दिलेल्या कर्जाचा आढावा घेण्याची भारताची IMF ला विनंती
Next articleDrones Set To Revolutionise Capabilities Of Indian Armed Forces

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here