भारत-चिली यांची CEPA साठी करारावर स्वाक्षरी; व्यापार संबंधांना चालना

0
CEPA

भारत आणि चिली या दोन्ही देशांनी ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अ‍ॅग्रीमेंट (CEPA)’ साठी, संदर्भ अटींच्या करारावर (Terms of Reference – ToR) गुरुवारी सह्या केल्या, ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे.

“चिलीचे भारतातील राजदूत- हिज एक्सलन्सी जुआन अँगुलो आणि भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयातील सहसचिव- विमल आनंद (जे भारताच्या बाजूने भारत-चिली CEPA चे मुख्य चर्चाकार आहेत) यांनी परस्पर सहमतीने ठरवलेल्या ToR वर स्वाक्षऱ्या केल्या,” असे भारत सरकारने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दोन्ही देशांनी आपल्या द्विपक्षीय संबंधांना अधिक दृढ करण्याच्या सामायिक दृष्टिकोनाची पुनरावृत्ती केली आणि 26 ते 30 मे दरम्यान, नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या पहिल्या चर्चासत्रासाठी सकारात्मक अपेक्षा व्यक्त केली.

CEPA चा उद्देश विद्यमान प्रेफरेंशियल ट्रेड अ‍ॅग्रीमेंट (PTA) च्या आधारे पुढे जात, डिजिटल सेवा, गुंतवणूक प्रोत्साहन, लघु व मध्यम उद्योग (MSME), महत्त्वाचे खनिज इत्यादी क्षेत्रांचा समावेश करत व्यापक आर्थिक सहकार्य आणि समन्वय वाढवण्याचा आहे.

भारत आणि चिली हे रणनीतिक भागीदार आणि जवळचे मित्र देश आहेत, आणि गेल्या काही वर्षांमध्ये परस्पर उच्चस्तरीय भेटींच्या माध्यमातून त्यांचे संबंध अधिक घट्ट झाले आहेत.

चौकट करार

भारत आणि चिली यांच्यात जानेवारी 2005 मध्ये, आर्थिक सहकार्यासाठी एक चौकट करार झाला होता. त्यानंतर मार्च 2006 मध्ये PTA वर स्वाक्षऱ्या झाल्या.

त्यानंतर दोन्ही देशांमधील आर्थिक व व्यावसायिक संबंध मजबूत राहिले असून, त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

सप्टेंबर 2026 मध्ये, PTA चा विस्तार करण्यात आला आणि तो 16 मे 2017 पासून प्रभावी झाला.

एप्रिल 2019 मध्ये, दोन्ही देशांनी PTA चा विस्तार करण्यासाठी सहमती दर्शवली, आणि 2019 ते 2021 दरम्यान यावर तीन चर्चा सत्रे झाली.

CEPA ची संकल्पना

दोन देशांनी आपल्या व्यापार संबंधांना अधिक दृढ करण्यासाठी, CEPA च्या वाटाघाटी सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे रोजगारनिर्मिती, गुंतवणूक प्रोत्साहन, सहकार्य आणि निर्यात वाढेल, असे चौकट कराराअंतर्गत स्थापन केलेल्या संयुक्त अभ्यास गटाने (Joint Study Group – JSG) सुचवले आहे.

JSG चा अहवाल 30 एप्रिल 2024 रोजी अंतिम केला गेला आणि त्यावर स्वाक्षऱ्याही झाल्या.

हा सामायिक दृष्टीकोन 1 ते 5 एप्रिल 2025 दरम्यान, भारतात आलेल्या चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट यांच्या राजकीय दौऱ्यातही अधोरेखित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावर हा दौरा झाला होता.

दोन्ही देशांच्या नेत्यांनी मान्य केले की, व्यापार आणि वाणिज्य हे द्विपक्षीय संबंधांचे मजबूत स्तंभ आहेत आणि नवीन संधी निर्माण करण्यासाठी विद्यमान व्यापार चौकट आणखी सशक्त करणे आवश्यक आहे.

याच भावनेतून, नेत्यांनी ToR वर स्वाक्षरी झाल्याचे स्वागत केले आणि CEPA साठीच्या वाटाघाटी सुरू करण्याचे नक्की केले. या CEPA चा उद्देश एक संतुलित, महत्वाकांक्षी, व्यापक आणि परस्पर लाभदायक करार करण्याचा आहे, जेणेकरुन दोन्ही देशांच्या व्यापास संबंधांना चालना मिळेल.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleजम्मू सीमेवरील पाकच्या घुसखोरीला BSF चे प्रत्युत्तर; 7 दहशतवाद्यांना कंठस्नान
Next articleFAKE News पासून सावधान! INS Vikrant आणि मुनीरविषयी खोटी माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here