Israeli Strike: सीरियाच्या राष्ट्रपती भवनाजवळ इस्रायलचा हल्ला

0

शुक्रवारी, इस्रायलने दमास्कस येथील राष्ट्रपती भवनाजवळ बॉम्बहल्ला केला. हा Israeli Strike, इस्लामी नेतृत्वाखालील सीरियन सत्ताधाऱ्यांविरोधातील आक्रमकतेचा स्पष्ट संकेत मानला जात आहे, तसेच सीरियामधील ड्रूझ अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाच्या नावाखाली लष्करी कारवाई तीव्र करण्याची तयारीला दर्शविणार आहे.

डिसेंबरमध्ये, बशर अल-असद यांना सत्तेवरून हटवण्यात आल्यानंतर, इस्रायलने सीरियामध्ये लष्करी कारवायांचे प्रमाण वाढवले आहे. देशभरात अनेक बॉम्बहल्ले करण्यात आले आहेत आणि दक्षिण-पश्चिम सीरियामध्ये जमिनीवरही सैन्य पाठवण्यात आले आहे. इस्रायलने सीरियाचे केंद्रीकरण टाळून ते वेगळे ठेवण्याची भूमिका घेतली आहे.

त्यांनी अंतरिम अध्यक्ष अहमद अल-शारा यांच्यावरील संशय आणि सीरिया, लेबनॉन आणि इस्रायलमध्ये अनुयायी असलेल्या. इस्लामच्आ ड्रुझ या अल्पसंख्याक पंथाचे संरक्षण करण्याच्या इच्छेभोवती आपली भूमिका मांडली आहे.

शुक्रवारी सकाळी इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, ‘त्यांनी शराआ यांच्या दमास्कसमधील राष्ट्रपती भवनाजवळील एका भागावर हल्ला केला. मात्र, याचे नेमके लक्ष्य काय होते, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. सीरियन अधिकाऱ्यांनी हल्ल्याबाबत त्वरित प्रतिक्रिया दिली नव्हती आणि कोणतीही जीवितहानी झाली असल्याचे अहवाल नव्हते.’

रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, एक सीरियन अधिकारी म्हणाले की, “हल्ल्याचे लक्ष्य राष्ट्रपती भवनाच्या भिंतींपासून सुमारे 100 मीटर (330 फूट) पूर्वेला होते.”

“सीरियन सत्ताधाऱ्यांना हा स्पष्ट संदेश आहे की: दमास्कसच्या दक्षिणेकडे सीरियन सैन्याची हालचाल किंवा ड्रूझ समुदायासाठी कोणत्याही प्रकारचा धोका आम्ही सहन करणार नाही,” असे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ यांनी संयुक्त निवेदनात म्हटले.

या हल्ल्याआधी काही दिवसांपासून, दमास्कसच्या आसपासच्या शहरांमध्ये सुन्नी मुस्लिम आणि ड्रूझ गटांमध्ये संघर्ष सुरू होता. एका ऑडिओ क्लिपमध्ये प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यामुळे या दंगली उसळल्या. या संघर्षात दोन डझनांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि इस्रायलने राजधानीच्या उपनगरातील एका शहरावर ‘चेतावणी पूर्वक’ हल्ला केला होता, ज्यात सीरियन सुरक्षा दलाचा एक सदस्य ठार झाला.

गुरुवारी हे संघर्ष दक्षिणेकडील ड्रूझबहुल स्वेइदा प्रांताच्या दिशेने पसरले.

गुरुवारी रात्री, स्वेइदा येथे ड्रूझ नेते आणि सीरियन सरकारी अधिकारी एकत्र आले आणि तणाव कमी करण्यासाठी बैठक घेतली. त्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले की, “स्वेइदाचे नागरिक आपल्या प्रांताचे संरक्षण सीरियाच्या अंतर्गत सुरक्षा दलाचा भाग म्हणून करतात आणि ते फाळणी, विभाजन किंवा विलगीकरण नाकारतात.”

या आठवड्यातील हिंसाचार, हे राष्ट्रपती शराआ यांच्यासाठी एक नवीन आव्हान ठरले आहे. त्यांनी वारंवार सांगितले आहे की, ‘ते सीरियाच्या सर्व सशस्त्र गटांना एकत्र करून देशाला एकात्मतेने चालवण्याचा प्रयत्न करतील’, जो देश गेल्या 14 वर्षांपासून गृहयुद्धामुळे तुटला होता.

मात्र, मार्चमध्ये प्र-असद अलावाइट समुदायातील शेकडो नागरिकांची हत्या झाल्याने, अल्पसंख्यांक समुदायामध्ये इस्लामी गटांबद्दल भीती वाढली आहे आणि यामुळे जागतिक पातळीवर निषेध व्यक्त केला गेला.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस म्हणाल्या की, “ड्रूझ समुदायावर लक्ष्य केलेले अलीकडील हिंसाचार व भडकाऊ भाष्य अत्यंत निषेधार्ह आणि अस्वीकार्य आहे.”

“आम्ही असे प्रतिनिधित्व करणारे भविष्यकालीन सीरियन सरकार पाहू इच्छितो, जे सर्व धार्मिक व वांशिक समुदायांचे संरक्षण करील आणि त्यांना समाविष्ट करील,” असे त्यांनी नमूद केले.

अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, “ते सध्या कोणत्याही गटाला सीरियाचे अधिकृत सरकार म्हणून मान्य करत नाहीत आणि फक्त ‘अंतरिम सत्ताधाऱ्यांच्या’, कृतीनुसारच ते नातेसंबंध सुधारण्याचा विचार करतील.”

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांच्या प्रशासनाने घातलेल्या कठोर अमेरिकी निर्बंधांपासून काही प्रमाणात सवलत मिळण्यासाठी, ‘समावेशक सीरियन सरकारची स्थापना’ ही एक महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleअहवालानुसार, इस्रायली मंत्रिमंडळाची गाझावरील व्यापक कारवाईला मंजुरी
Next articleमोठा निर्णय; भारताने सर्व प्रकारच्या Pakistani Imports वर घातली बंदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here