कानपूर येथील संरक्षण आणि होमलँड सिक्युरिटी सोल्यूशन्स एमकेयू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ऑलिम्पिकच्या स्पर्धकाला थेट पाठबळ देणारी पहिली भारतीय संरक्षण कंपनी बनली आहे.
कंपनीने पंजाबमधील 20 वर्षीय नेमबाजीची विलक्षण प्रतिभा असलेल्या संजीता दासला आर्थिक पाठबळ देण्याचे वचन दिले आहे. संजीता सध्या 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेवर लक्ष ठेवून प्रशिक्षण घेत आहे.
हे सहकार्य कॉर्पोरेट क्षेत्रात होणारा एक उल्लेखनीय बदल दर्शवणारे आहे.आतापर्यंत भारतीय संरक्षण कंपन्यांनी पारंपरिकपणे लष्करी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. एखाद्या खेळाडूला आर्थिक पाठिंबा देत एमकेयू कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या क्षेत्रात नवीन पायंडा तयार करत आहे.
ऑलिम्पिकमधील आशा
भारतीय नेमबाजीतील एक उदयोन्मुख स्टार संजीताने तिच्या अतूट लक्ष, मानसिक दृढता आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाबद्दल सर्वांचीच वाहवा मिळवली आहे. उत्कृष्टतेसाठी सुरू असणारे तिचे अथक परिश्रम एमकेयूच्या मूलभूत मूल्यांचे प्रतिबिंब आहे-लवचिकता, अचूकता आणि कामगिरीप्रती वचनबद्धता.
एमकेयू लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक नीरज गुप्ता म्हणाले, “एमकेयूमध्ये, जे युद्धभूमीवर आणि त्यापलीकडे त्यांच्या मर्यादा ओलांडतात त्यांना सक्षम बनवण्यावर आमचा विश्वास आहे.” संजीताची उत्कटता आणि चिकाटी खऱ्या नायकाच्या भावनेला मूर्त रूप देते. ती जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत असल्याने तिच्या प्रवासाला पाठिंबा देण्यात आम्हाला अभिमान आहे.”
आपल्या पाठबळाचा एक भाग म्हणून, एमकेयू संजीताला जागतिक दर्जाची स्टेयर चॅलेंज ई एअर रायफल (.177 कॅलिबर) आवश्यक उपकरणांसह सुसज्ज करून दिली आहे. ही रायफल तिला आंतरराष्ट्रीय नेमबाजीच्या सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करण्यास मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन ठरणार आहे.
हा उपक्रम एमकेयूच्या नायकांना सक्षम बनवण्याच्या मार्गदर्शक तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे. हा असा एक दृष्टीकोन आहे जो कंपनीने सशस्त्र दलांसोबतच्या त्याच्या कार्यासाठी दीर्घकाळ लागू केला आहे आणि आता तो संरक्षण क्षेत्राबाहेरील तरुण परिवर्तकांपर्यंत विस्तारला आहे.
“नायकांना सक्षम करणे हा केवळ एक नारा नाही-ती एक चळवळ आहे”, गुप्ता पुढे म्हणाले. “आम्ही भारतभरातील व्यक्ती, संस्था आणि संघटनांना संजीताच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करतो. चला तिच्या स्वप्नामध्ये गुंतवणूक करूया आणि ऑलिम्पिक गौरवाच्या तिच्या प्रवासाला पाठिंबा देऊया,” असे कंपनीने म्हटले आहे.
या धाडसी पावलाच्या माध्यमातून एमकेयू केवळ उत्कृष्टतेप्रती आपली बांधिलकीच बळकट करत नाही तर पारंपरिक सीमांच्या पलीकडे राष्ट्र उभारणीत संरक्षण उद्योगाच्या भूमिकेसाठी एक शक्तिशाली उदाहरण देखील स्थापित केले आहे.
टीम भारतशक्ती