L&TAdani DefenceSolar GroupGeneral Atomics MQ-9B SkyGuardian – Whatever the Mission, MQ-9B Delivers
Sunday, November 1, 2026
Solar
General Atomics MQ-9B SkyGuardian – Whatever the Mission, MQ-9B Delivers
Home Bharat Shakti Marathi संभाव्य तंत्रज्ञान सहयोगावर मोदी-मस्क यांच्यात चर्चा

संभाव्य तंत्रज्ञान सहयोगावर मोदी-मस्क यांच्यात चर्चा

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तंत्रज्ञान उद्योजक एलोन मस्क यांच्याशी चर्चा केली. तंत्रज्ञान तसेच नवकल्पनांच्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्याच्या व्याप्तीवर त्यांच्यात चर्चा झाली.

“@elonmusk यांच्याशी बोलणे झाले आणि या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डी. सी. येथे झालेल्या आमच्या बैठकीत आम्ही मांडलेल्या विषयांसह विविध विषयांवर चर्चा झाली. आम्ही तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या क्षेत्रातील सहकार्याच्या अफाट संभाव्यतेवर चर्चा केली,”  असे मोदी यांनी एलन मस्क यांच्याशी झालेल्या संभाषणानंतर एक्सवर लिहिले.

“या क्षेत्रांमध्ये अमेरिकेबरोबरची आमची भागीदारी पुढे नेण्यासाठी भारत वचनबद्ध आहे,” असे ते म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यांनी सुरू झालेल्या भीषण व्यापार युद्धात अमेरिका गुंतलेली असताना हे संभाषण झाले.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के परस्पर शुल्क लादले आहे.

गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी चीन वगळता सर्व देशांवर परस्पर शुल्क लादण्याच्या निर्णयाला 90 दिवसांची स्थगिती जाहीर केली.

पियुष गोयल यांची स्टारलिंकच्या चमूशी भेट

भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी अलीकडेच उद्योजक एलोन मस्क यांच्या मालकीच्या स्टारलिंकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भारतातील त्यांच्या विद्यमान भागीदारी आणि भविष्यातील गुंतवणूक योजनांवर चर्चा केली.

बैठकीबद्दल बोलताना गोयल यांनी एक्सवर लिहिलेः “उपाध्यक्ष चॅड गिब्स आणि वरिष्ठ संचालक रायन गुडनाईट यांचा समावेश असलेल्या @Starlink च्या शिष्टमंडळाला भेटलो.”

“स्टारलिंकचा अत्याधुनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म, त्यांची सध्याची भागीदारी आणि भारतातील भविष्यातील गुंतवणूक योजना यावर चर्चा झाली,” असे ते म्हणाले.

भारतातील प्रमुख खाजगी दूरसंचार ऑपरेटर एअरटेल आणि जिओ यांनी अलीकडेच दक्षिण आशियाई देशातील त्यांच्या ग्राहकांसाठी हाय-स्पीड उपग्रह इंटरनेट सेवा आणण्यासाठी स्टारलिंकशी भागीदारी केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील शपथविधी समारंभानंतर काही दिवसांनी या घडामोडी घडल्या आहेत.

एलोन मस्क हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय आहेत.

स्टारलिंक

अधिकृत संकेतस्थळानुसार, स्टारलिंक हा जगातील पहिला आणि सर्वात मोठा उपग्रह समूह आहे, जो low Earth orbitचा वापर करून प्रसारण, ऑनलाइन खेळ, व्हिडिओ कॉल आणि बरेच काही करण्यास सक्षम ब्रॉडबँड इंटरनेट वितरीत करतो.

स्टारलिंकचा दावा आहे की ते जगभरातील वापरकर्त्यांना उच्च-गती, कमी विलंबित इंटरनेट पुरवते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleINS Sunayna Arrives in Mozambique to Strengthen India-Africa Maritime Ties
Next articleमॉस्को विजय दिन संचलनात भारताच्या सशस्त्र दलांचे पथक होणार सहभागी