L&TAdani DefenceSolar GroupGeneral Atomics MQ-9B SkyGuardian – Whatever the Mission, MQ-9B Delivers
Saturday, October 31, 2026
Solar
General Atomics MQ-9B SkyGuardian – Whatever the Mission, MQ-9B Delivers
Home Bharat Shakti Marathi अमेरिकेकडून भारताला $131 Mn डॉलर्सच्या Military Sale साठी मंजुरी

अमेरिकेकडून भारताला $131 Mn डॉलर्सच्या Military Sale साठी मंजुरी

0

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने भारताला $131 मिलियन डॉलर्सच्या सागरी तंत्रज्ञान विक्रीला मंजुरी दिली आहे.

अमेरिकेने, भारताला $131 दशलक्ष डॉलर्स किंमतीची अत्यावश्यक लष्करी उपकरणे आणि लॉजिस्टिक सहाय्य विक्रीसाठी मंजुरी दिली आहे, ज्यामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील (Indo-Pacific region) सागरी सुरक्षा सहकार्य बळकट होईल.

पेंटॅगॉनच्या अंतर्गत काम करणाऱ्या, US डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी (DSCA) ने, या प्रस्तावित विक्रीसाठी आवश्यक प्रमाणपत्र दिले असून, अमेरिकन काँग्रेसला याची अधिकृत सूचना देण्यात आली आहे.

ही उपकरणे, फॉरेन मिलिटरी सेल्स (FMS) कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताला पुरवण्यात येणार असून, ‘Indo-Pacific Maritime Domain Awareness’ (MDA) च्या उपक्रमांतर्गत, भारत-अमेरिका भागीदारीशी सुसंगत आहेत.

“स्टेट डिपार्टमेंटने भारताला, इंडो-पॅसिफिक मरीटाईम डोमेन अवेअरनेस व संबंधित उपकरणांची सुमारे 131 दशलक्ष डॉलर्स किमतीची संभाव्य विक्री करण्यास मंजुरी दिली आहे,” असे DSCA च्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

भारताने SeaVision सॉफ्टवेअर, रिमोट सॉफ्टवेअर, विश्लेषणात्मक सहाय्य, संबंधित दस्तऐवज आणि लॉजिस्टिक सेवा यांची मागणी केली आहे.

भारतीय अधिकाऱ्यांनी अद्याप या प्रस्तावित विक्रीची पुष्टी केलेली नसली, तरी अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, “वॉशिंग्टनने उचललेली ही पावले, भारताशी धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहेत.”

“ही प्रस्तावित विक्री भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी मजबूत करून, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्दिष्टांना पाठिंबा देईल,” असे DSCA ने म्हटले आहे. “यामुळे इंडो-पॅसिफिक आणि दक्षिण आशियातील राजकीय स्थैर्य, शांतता आणि आर्थिक प्रगतीलाही चालना मिळेल,” असे त्यांचे म्हणणे आहे.

DSCA च्या मते, ही विक्री भारताच्या सागरी क्षेत्रातील माहिती जाणण्याची क्षमता, विश्लेषणात्मक क्षमतांमध्ये वाढ आणि भविष्यातील तसेच सध्याच्या धोक्यांवर प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी धोरणात्मक भूमिका मजबूत करेल. तसेच, भारत या नव्या क्षमतांचा सहज समावेश करू शकेल.

या विक्रीचा मुख्य ठेकेदार ‘हॉकेआय 360’ (Hawkeye 360) असून, ही कंपनी व्हर्जिनियामधील हर्नडन येथे स्थित अमेरिकन संरक्षण तंत्रज्ञान संस्था आहे.

DSCA ने स्पष्ट केले की, ‘या विक्रीमुळे प्रादेशिक लष्करी संतुलन बिघडणार नाही आणि अमेरिकेच्या लष्करी तयारीवर कोणताही परिणाम होणार नाही.’

– टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleसुरक्षा चाचणीनंतर ‘ALH Dhruv’ हेलिकॉप्टर्सना, लष्करी ऑपरेशन्ससाठी मंजूरी
Next articleThailand: रक्कम वाटपाला विलंब; मतदार संतप्त, राजकीय धोका निर्माण