लष्कराचे पहिले Apache Helicopter हिंडनमध्ये दाखल, लष्कराची मोठी भरारी

0

आज भारतीय वायुदलाच्या हिंडन एअर बेसवर, तीन Apache AH-64E हेलिकॉप्टर्सची पहिली तुकडी पोहोचली. भारतीय लष्करात दाखल झालेले हे सर्वात पहिले Apache Helicopter असून, यामुळे भारत–अमेरिका संरक्षण सहकार्य आणि लष्करी एव्हिएशन दलाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे.

उर्वरित तीन हेलिकॉप्टर्स वर्षाअखेरीपर्यंत भारतात दाखल होण्याची अपेक्षा आहे. ही हेलिकॉप्टर्स संयुक्त मोहिमांमध्ये विशेषतः हवाई हल्ल्यांची क्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. भारतीय हवाई दल आधीपासूनच  वापरत असून, त्यातील एक स्क्वॉड्रन पठाणकोट आणि एक जोरहाट येथे तैनात आहे.

फेब्रुवारी 2020 मध्ये, भारतीय लष्करासाठी विशेष कॉन्फिगरेशनसह 6 Apache Helicopter खरेदी करण्याकरिता, $800 दशलक्ष डॉलर्स किंमतीचा करार करण्यात आला होता. काही तांत्रिक कारणांमुळे झालेल्या मोठ्या विलंबानंतर अखेर, यातील पहिल्या बॅचचे आगमन झाले आहे. सीमेवरील सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात आणि भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

“Apache Helicopters ची पहिली तुकडी आज भारतात दाखल झाली, हा भारतीय लष्करासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, ” असे भारतीय लष्कराने सोशल मीडियाद्वारे म्हटले आहे.

“या अत्याधुनिक प्लॅटफॉर्ममुळे भारतीय लष्कराच्या ऑपरेशनल क्षमतेत मोठी भर पडणार आहे,” असेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले.

Apache Helicopter इतके महत्त्वाचे का?

Boeing कंपनीने बनवलेले AH-64E अपाचे हेलिकॉप्टर, हे जगातील सर्वात प्रगत लढाऊ हेलिकॉप्टर्सपैकी एक मानले जाते. यात अत्याधुनिक सेन्सर्स, इंटिग्रेटेड एव्हिऑनिक्स आणि प्रबळ शस्त्रसामग्री आहे, ज्यामध्ये AGM-114 हेलफायर क्षेपणास्त्रे, 70 मिमी रॉकेट्स आणि 30 मिमी चेनगन समाविष्ट आहेत, जी प्रतीमिनिट 650 गोळ्या फायर करू शकते.

“फ्लाइंग टँक” म्हणून ओळखले जाणारे हे हेलिकॉप्टर्स रणांगणात चपळ, टिकाऊ आणि घातक ठरतात. यामध्ये लॉंगबो रडार प्रणाली आहे, जी एकाचवेळी 120 हून अधिक लक्ष्य ट्रॅक करून त्यांच्यावर हल्ला करू शकते, जे उच्च तीव्रतेच्या ऑपरेशन्ससाठी फारच महत्त्वाचे आहे.

पश्चिम आणि उत्तर सीमांवर तणाव कायम असताना, हे अपाचे हेलिकॉप्टर्स थलसेनेच्या जमिनीवरील युनिट्सना साथ देण्यात निर्णायक भूमिका बजावतील, विशेषतः राजस्थानच्या वाळवंटी भागात, जिथे 451 लष्करी विमानन स्क्वॉड्रन नुकतीच तयार करण्यात आली आहे.

बराच विलंब, पण धोरणात्मक वेळ योग्य

मुळात ही हेलिकॉप्टर्स, मे 2024 पर्यंत पोहोचवण्याचे नियोजन होते, पण काही राजनैतिक तणाव, त्यात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि भारताच्या “ऑपरेशन सिंदूर”नंतरच्या घडामोडींमुळे विलंब झाला. मात्र, डिलिव्हरी आता पुन्हा गती पकडत आहे.

याच महिन्यात, अमेरिकेने भारताच्या तेजस Mk2 फायटर प्रोग्रॅमसाठी GE F414 जेट इंजिन्सची डिलिव्हरी केली, ही देखील एक जुनी पण महत्त्वाची संरक्षण कराराची अंमलबजावणी होती. हेलिकॉप्टर्स व इंजिन्सची एकत्रित डिलिव्हरी भारत–अमेरिका धोरणात्मक सहकार्याला नवसंजीवनी देत आहे.

लष्करासाठी स्वतंत्र अपाचे हेलिकॉप्टर्स

भारतीय हवाई दलाने, 2015 च्या करारानुसार 22 अपाचे हेलिकॉप्टर्स आधीपासूनच वापरात आणली आहेत, मात्र ही पहिली वेळ आहे, जेव्हा भारतीय लष्कर स्वतःचे अपाचे स्वतंत्रपणे वापरणार आहे. आजवर लष्करी एव्हिएशन दलाने स्वदेशी HAL रुद्र हेलिकॉप्टर्स वापरली आहेत, परंतु अपाचेची लढाऊ ताकद आणि टिकाऊ क्षमता कित्येक पटीने अधिक आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleBangladesh Jet Crash: अपघातातील मृतांचा आकडा 27 वर पोहोचला
Next articleएका युगाचा अंत: 60 वर्षांच्या सेवेनंतर भारताचे MiG-21 फायटर अखेर निवृत्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here