EU मधील व्यापार तणावांदरम्यान, जिनपिंग यांची स्पेनला भागीदारीची ऑफर

0
जिनपिंग

बुधवारी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी, स्पेनचे राजे फेलिपे सहावे यांच्यासमोर, “महत्त्वपूर्ण जागतिक प्रभाव” असलेल्या भागीदारीचा दृष्टीकोन मांडला. युरोपियन युनियन (EU) मध्ये माद्रिदचा (स्पेनचा) पाठिंबा मिळवावा आणि त्या बदल्यात आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करावे, असे बीजिंगचे उद्दिष्ट आहे, याच पार्श्वभूमीवर जिनपिंग यांच्याकडून ही ऑफर देण्यात आली.

बीजिंगमध्ये बैठक संपन्न

स्पेनचे राजे फेलिपे सहावे, हे 18 वर्षांनंतर चीनला भेट देणारे पहिले स्पॅनिश सम्राट ठरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेनला, नाटो (NATO) मधील योगदान न वाढवल्यास “दुप्पट किंमत मोजावी लागेल” अशी धमकी दिल्यानंतर, माद्रिदने चीनकडून नव्या गुंतवणुकीसाठी सक्रिय प्रयत्न सुरू केले.

चीनच्या दृष्टीने, ही भेट युरोपियन युनियनसोबतच्या व्यापारी मतभेदांनंतरचे तणाव कमी करण्याची संधी आहे. चीनच्या इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला मिळणाऱ्या मोठ्या अनुदानांवरून, 27 सदस्य असलेल्या युरोपियन संघाशी वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीजिंग अधिक समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहे.

त्याचबरोबर, व्हाईट हाऊससोबतच्या तणावामुळे चीनच्या निर्यात-आधारित अर्थव्यवस्थेवर दबाव येत आहे, ज्यामुळे चिनी कंपन्या लॅटिन अमेरिका आणि उत्तर आफ्रिका यांसारख्या प्रदेशांमध्ये नवीन व्यावसायिक केंद्र शोधत आहेत, जिथे स्पेनचे जुने संबंध आहेत.

राज्य माध्यमांनुसार, शी जिनपिंग यांनी बैठकीदरम्यान “लॅटिन अमेरिकेसारख्या तृतीय बाजारपेठांमध्ये चीनी आणि स्पॅनिश कंपन्यांनी संयुक्तपणे संधी शोधाव्यात” असा प्रस्तावही मांडला.

दरम्यान, स्पेनने युरोपियन युनियनच्या चौकटीत आपली राजनैतिक सक्रियता वाढवली आहे, ज्यामध्ये जपान आणि दक्षिण कोरियासोबत पुरवठा साखळी सहकार्य वाढवण्याचे आणि चीनसोबत व्यापार संबंध मजबूत करण्याचे कार्यक्रम नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.

माद्रिदचा आर्थिक संबंध वाढवण्यावर भर

युरोपमधील सर्वात मोठा डुकराच्या मांसाचा (पोर्क) निर्यातदार असलेल्या स्पेनला, सप्टेंबरमध्ये मोठा आर्थिक फटका बसला, जेव्हा चीनने EU मधील डुकराच्या मांसावर 62.4% टॅरिफ लादले. चिनी इलेक्ट्रिक वाहनांवर (EVs) EU ने लावलेल्या शुल्कांना उत्तर देण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले होते.

ऑक्टोबर 2024 मध्ये, या विषयासंदर्भात मतदानात स्पेनने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता.

तेव्हापासून, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी हे टॅरिफ हटवण्यासाठी सक्रिय प्रयत्न सुरू केले, आणि युरोपातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला चीनसाठी गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय म्हणून सादर केले.

स्पेन दरवर्षी चीनला सुमारे 1.2 अब्ज  डॉलर्स किमतीचे मांस आणि संबंधित-उत्पादनांची विक्री करतो, जो चीनच्या एकूण पोर्क आयातीच्या जवळपास पाचवा भाग आहे.

गेल्या आठवड्यात, चीनने 2021 पासून स्थगित असलेली स्पेनसोबतची गुंतवणूक चर्चा, पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleअफगाणिस्तानने केले पाकिस्तानसोबतचे व्यापारी मार्ग बंद
Next articleRudra Integrated All Arms Brigade Declared Fully Operational After Exercise Akhand Prahaar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here