लष्करप्रमुखांचा कोलंबो दौरा; भारत–श्रीलंका संरक्षण संबंधांना नवी चालना

0

भारताचे लष्करप्रमुख, जनरल उपेंद्र द्विवेदी, 1 आणि 2 डिसेंबर रोजी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ही भेट. द्विपक्षीय लष्करी सहकार्याचा मार्ग पुन्हा परिभाषित करण्याच्या टप्प्यावर होत असून, हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षिततेसाठी महत्त्वाची मानली जात आहे. संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ही भेट वर्षभरात दोन्ही लष्करांमध्ये झालेल्या विविध उच्चस्तरीय बैठकींच्या सर्वोच्चस्थानी असेल.

धोरणात्मक संवादाच्या वर्षाची सांगता करणारा दौरा

लष्करप्रमुखांचा हा दौरा, धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. 2025 मध्ये, भारत आणि श्रीलंकेने उच्चस्तरीय लष्करी शिष्टमंडळांची देवाणघेवाण केली आहे, ज्यामध्ये श्रीलंकेच्या लष्करप्रमुखांनी या वर्षाच्या सुरुवातीला भारताचा अधिकृत दौरा केला, आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये भारतीय नौदलप्रमुखांनी कोलंबोला भेट दिली.

या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांच्या या भेटीसह, दोन्ही देश ‘क्रॉस-सर्व्हिस प्रतिबद्धतेचे’ एक संपूर्ण चक्र पूर्ण करत, या वर्षाची सांगता करत आहेत. विश्लेषकांच्या मते, हे सातत्य, गती टिकवून ठेवण्याचा, विश्वास निर्माण करण्याचा आणि दोन्ही लष्करे सामायिक सुरक्षा प्राधान्यांवर एकरूप राहतील याची खात्री करण्याच्या प्रयत्नांना दर्शवते.

स्थिर व्यावसायिक संपर्कातून दृढ झालेले संबंध

गेल्या दहा वर्षांत, भारत–श्रीलंका यांच्यातील संरक्षण सहकार्य; सातत्यपूर्ण संवाद, संयुक्त प्रशिक्षण आणि सैद्धांतिक संवादातून अधिक मजबूत झाले आहे. जनरल एम. एम. नरवणे यांच्या 2021 मधील श्रीलंका भेट, ज्यादरम्यान त्यांनी ‘मित्र शक्ती’ (Mitra Shakti) हा संयुक्त अभ्यास अनुभवला, त्या आणि अशा अन्य भेटी, आणि सोबतच श्रीलंकेच्या विविध लष्करप्रमुखांच्या भारत दौऱ्यांमुळे, दोन्ही देशात संस्थात्मक संबंध अधिक दृढ केले आहेत. 

यावर्षीही, श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी इंडियन मिलिटरी ॲकॅडमीसह प्रमुख भारतीय लष्करी संस्थांना पुन्हा एकदा भेट दिली, ज्यामुळे परस्पर भागीदारीला आकार देण्यात व्यावसायिक दृष्टीकोनाची भूमिका अधोरेखित होते. हे आदानप्रदान, औपचारिक भेटींपलीकडील आणि मोठ्या प्रमाणात व्यावहारिक सहकार्यावर अवलंबून असलेल्या संबंधांना प्रतिबिंबित करते.

भारताच्या “नेबरहुड फर्स्ट” धोरणाला चालना

लष्करप्रमुखांच्या कोलंबो येथील आगामी चर्चेत- क्षमता वाढ, कार्यात्मक सहकार्य आणि हिंद महासागर प्रदेशातील सामायिक सुरक्षा धोक्यांवर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. हा दौरा भारताच्या “नेबरहुड फर्स्ट” दृष्टिकोनाला बळ देतो, ज्याअंतर्गत नवी दिल्ली आपल्या सर्वात जवळच्या भागीदारांसोबत स्थिरता, आंतरकार्यक्षमता आणि विश्वासार्ह प्रतिबद्धता यंत्रणांना प्राधान्य देते.

श्रीलंकेने भारताला कायमच संरक्षण प्रशिक्षण, तंत्रज्ञान सहाय्य आणि संकटकालीन समर्थनाचा प्राथमिक स्रोत मानले आहे. तर, भारतही उत्तर हिंद महासागरात सुरक्षित आणि अंदाजित सागरी वातावरण सुनिश्चित करण्यासाठी श्रीलंकेला मध्यवर्ती आधारस्तंभ मानतो.

प्रतीकात्मकतेसह रणनीतिक दृष्टिकोन

या भेटीमध्ये, ऑपरेशनल सहकार्य हा विषय चर्चेचा भाग असेलच, परंतु यात प्रतीकात्मक कार्यक्रमही समाविष्ट असतील. दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांनी सामायिक केलेल्या स्मारकांना आदरांजली वाहिली जाईल, ज्याद्वारे सामायिक बलिदानांवर आधारित दीर्घकालीन लष्करी संबंधांचा सन्मान केला जाईल.

तसेच यामुळे, संरक्षण आधुनिकीकरण आणि उदयोन्मुख धोक्यांविषयीच्या महत्त्वपूर्ण संभाषणांसह, या भेटीला भूतकाळाची स्वीकृती आणि भविष्यातील सहकार्याचा रोडमॅप असे दुहेरी स्वरूप प्राप्त होईल.

संरक्षणापलीकडील अभिसरण

जागतिक भू-राजकीय क्षेत्रापर्यंत विस्तारित असलेल्या काही मुद्द्यांवरही दोन्ही देश एकमेकांशी संरेखित आहेत. कोलंबोने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणांसाठी, नवी दिल्लीच्या दीर्घकाळ मागणीला पाठिंबा दिला आहे, तर भारताने ब्रिक्स (BRICS) सारख्या गटांमार्फत आपली राजनैतिक पोहोच वाढवण्याच्या श्रीलंकेच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. या एकमेकांना पूरक भूमिका जागतिक दृष्टिकोनातील व्यापक संरेखन दर्शवतात, जे द्विपक्षीय संरक्षण सहकार्याला बळकटी देत आहे.

विस्तारासाठी सज्ज असलेली भागीदारी

वर्ष 2025 संपत असताना, भारतीय लष्करप्रमुखांचा हा दौरा एका अशा भागीदारीवर जोर देतो, जी तात्कालिक प्रतिबद्धतेतून संरचित आणि भविष्यवेधी सहकार्यात स्थिरपणे रूपांतरित होत आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात दोन्ही देशांना नवीन धोरणात्मक दबावांचा सामना करावा लागत असल्याने, हा दौरा संरक्षण सहकार्याच्या पुढील टप्प्यासाठी दिशा निश्चित करण्याची शक्यता आहे, जो सिद्धता, सामायिक जबाबदारी आणि दीर्घकालीन संस्थात्मक बळकटीकरणावर भर देईल.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIAF, French Air and Space Force Scale Up Interoperability in Exercise Garuda 25
Next articleFrance’s Safran Expands Aerospace Footprint in India with Engine MRO Facility in Hyderabad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here