पेजरस्फोटांचा मास्टरमाईंड इस्रायल असल्याचा आरोप करत त्याला प्रत्युत्तर देण्याचे वचन हिजबुल्ला या दहशतवादी गटाने दिले. मंगळवारी संपूर्ण लेबनॉनमध्ये झालेल्या या स्फोटांमध्ये किमान नऊ लोक ठार झाले असून लढाऊ सैनिक आणि बैरूतमधील इराणच्या राजदूतासह सुमारे 3 हजार लोक जखमी झाले.
लेबनॉनचे माहितीमंत्री झियाद मकारी यांनी हिजबुल्ला आणि इतर लोक संदेश पाठवण्यासाठी वापरत असलेल्या पेजर-हँडहेल्ड उपकरणांच्या दुपारी झालेल्या स्फोटाचा “इस्रायली आक्रमण” म्हणून निषेध केला. इस्रायलला या स्फोटांची योग्य शिक्षा मिळेल, असे हिजबुल्लाहने म्हटले आहे.\
ऑक्टोबरमध्ये गाझा युद्ध सुरू झाल्यापासून इराणसमर्थित हिजबुल्लाहसोबत सीमेपलीकडील लढाईत गुंतलेल्या इस्रायली सैन्याने स्फोटांविषयीच्या प्रश्नांना उत्तर देण्यास नकार दिला.
लेबनॉनचे आरोग्यमंत्री फिरास अबियाद यांनी मंगळवारी सांगितले की, पेजरस्फोटात नऊ लोक ठार झाले असून 2 हजार 750 जखमी झाले, त्यापैकी 200 जणांची प्रकृती गंभीर आहे.
MAJOR DEVELOPING STORY: Hundreds of Hezbollah terrorists all over Lebanon were just killed / severely injured when their “pagers” all suddenly simultaneously exploded in a scene out of science fiction. pic.twitter.com/4VxzwXzonv
— Breaking911 (@Breaking911) September 17, 2024
हिज्बुल्लाहने आधीच्या निवेदनात सांगितले आहे की मृतांमध्ये त्यांचे किमान दोन सैनिक आणि एका लहान मुलीचा समावेश आहे.
पेजरचा स्फोट दक्षिण लेबनॉनमधील बैरूतच्या दक्षिणेकडे दहिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरात आणि पूर्व बेका खोऱ्यात झाला-हे सर्व हिजबुल्लाचे बालेकिल्ले आहेत.
प्रादेशिक ब्रॉडकास्टरने व्हायरल केलेल्या एका क्लोज-सर्किट व्हिडिओमध्ये एक व्यक्ती किराणा दुकानात पैसे देत असतानाच कॅशियरच्या शेजारी ठेवलेले एक लहान हँडहेल्ड डिव्हाइस स्फोट पावल्याचे दिसले.
हिजबुल्लाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, पेजरचा स्फोट हा इस्रायलशी गेल्या वर्षभरात सुरू असलेल्या संघर्षामधील “सर्वात मोठा सुरक्षाभंग” होता.
गाझामध्ये इस्रायलशी युद्ध पुकारलेल्या पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमासने म्हटले आहे की, पेजरस्फोट ही अत्यंत दुर्दैवी घटना असून ती इस्रायलला केवळ ‘अपयश आणि पराभव’ याकडेच घेऊन जाईल.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की लेबनॉनमधील पेजर हल्ल्यांचा गाझामधील युद्धविराम करण्याच्या प्रयत्नांवर कसा परिणाम होऊ शकतो हे आता सांगणे फार लवकर होईल.
त्याने इराणसमर्थित हिजबुल्ला, येमेनचे हौथी आणि इराकमधील सशस्त्र गटांसह इस्रायली आणि अमेरिकेच्या विरोधात ‘ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ म्हणजे अस्थिरता वाढवण्यासाठी कोणत्याही घटनेचा फायदा न घेण्याचे आवाहन केले आहे.
लेबनॉनमधील स्फोटांवर थेट भाष्य न करता इस्रायली लष्करी प्रवक्त्याने सांगितले की, चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल हर्झी हलेवी यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. धोरणात कोणताही बदल जाहीर करण्यात आलेला नसला तरी “दक्षता कायम ठेवली पाहिजे” असे ते म्हणाले.
आपल्या ठिकाणांचा इस्रायलकडून मागोवा घेण्याचा प्रयत्न होऊ नये किंवा तो टाळण्यासाठी हिजबुल्लाच्या अतिरेक्यांनी फारसे प्रगत नसलेले साधन म्हणून पेजर वापरण्यास सुरुवात केली होती, असे या गटाच्या कारवायांशी परिचित असलेल्या दोन सूत्रांनी या वर्षाच्या सुरुवातीला रॉयटर्सला सांगितले होते. पेजर हे एक वायरलेस दूरसंचार उपकरण असून यात संदेश प्राप्त करता येतो तसेच संदेश बघताही येतो.
अनेक जखमी
मंगळवारी झालेल्या पेजर स्फोटात लेबनॉनमधील इराणचे राजदूत मोजताबा अमानी यांना “किरकोळ दुखापत” झाली असून त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, असे इराणच्या फार्स या वृत्तसंस्थेने सांगितले.
मृतांमध्ये हिजबुल्लाच्या सैनिकांचा समावेश आहे, जे सशस्त्र गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुले आहेत, असे दोन सुरक्षा सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले. ठार झालेल्यांपैकी एक लेबनॉनच्या संसदेचे हिजबुल्ला सदस्य अली अम्मार यांचा मुलगा होता, असे त्यांनी सांगितले.
“जे यात सहभागी आहेत ते एक, दोन किंवा तीनजणांचे लक्ष्य नसून, संपूर्ण देशाचे लक्ष्य आहे,” असे हिजबुल्लाचे वरिष्ठ अधिकारी हुसेन खलील यांनी अम्मारच्या मुलाबद्दल शोक व्यक्त करताना सांगितले.
लेबनॉनचे प्रसारक अल जदीद यांनी अम्मार यांना लवकरच या हल्ल्याचे परिणाम बघायला मिळतील असे सांगितले. “शत्रूला ज्या भाषेत समजते त्याच भाषेत आम्ही त्याच्याशी लढू,” असे ते पुढे म्हणाले.
मंगळवारी झालेल्या स्फोटांनंतर हिजबुल्लाहने गेल्या वर्षभरात दहशतवादाची मोठी किंमत मोजली आहे. इस्रायली हल्ल्यांमध्ये या गटाचे 400 हून अधिक सैनिक ठार झाले आहेत. यात जुलैमध्ये त्याचा प्रमुख कमांडर फुआद शुक्र याचादेखील समावेश आहे. लेबनॉनमधील सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, मंगळवारी दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात आणखी दोन हिजबुल्ला सैनिक मारले गेले.
तत्पूर्वी मंगळवारी इस्रायलच्या देशांतर्गत सुरक्षा संस्थेने सांगितले की, मागील काही दिवसांमध्ये हिजबुल्लाहने आखलेल्या एका माजी वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याच्या हत्येचा कट त्यांनी उधळून लावला आहे.
अधिकाऱ्याचे नाव न सांगणाऱ्या शिन बेट एजन्सीने एका वृत्तात म्हटले आहे की, त्यांनी दुरून स्फोट घडवून आणणाऱ्या एका प्रणालीला जोडलेले एक स्फोटक उपकरण जप्त केले आहे, ज्यामध्ये हिजबुल्लाहने लेबनॉनमधून काम करण्यासाठी मोबाईल फोन आणि कॅमेरा वापरलेला आहे.
हिजबुल्लाने म्हटले आहे की त्याला इस्रायलशी सुरू असणारा संघर्ष पूर्णपणे संपवायचा आहे. मात्र गाझा युद्ध संपले तरच सीमेपलीकडील संघर्ष थांबतील. कतार, इजिप्त आणि अमेरिकेने मध्यस्थी करूनही अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर गाझा युद्धबंदीच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.
रॉयटर्सच्या एका पत्रकाराने हिजबुल्लाचा बालेकिल्ला असलेल्या बैरूतच्या दक्षिणेकडील उपनगरातून रुग्णवाहिकांची लगबग बघितली. बैरूतच्या अगदी बाहेर माउंट लेबनॉन रुग्णालयात, रॉयटर्सच्या एका पत्रकाराने आपत्कालीन कक्षाकडे मोटारसायकल स्पीडमध्ये जाताना आणि त्यावर असलेल्या लोकांचे रक्ताने माखलेले हात अणि वेदनेने कळवत असल्याचे दृश्य बघितले.
देशाच्या दक्षिणेकडील नबातीह सार्वजनिक रुग्णालयाचे प्रमुख हसन वाझनी यांनी रॉयटर्सला सांगितले की सुमारे 40 जखमींवर त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या चेहरा, डोळे आणि हातापायांवर मोठ्या प्रमाणातील जखमांचा समावेश आहे.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)